10 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

गौतम अदानी
गौतम अदानी

10 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2022)

गौतम अदानी ठरले जागतील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश :

  • अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
  • तर त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.
  • मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे.
  • तसेच बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलंय.
  • तर याचवेळी अंबानींची एकून संपत्ती ही 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे.
  • अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत.

प्रो लीग हॉकीत भारताकडून आफ्रिकेचा धुव्वा :

  • भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’प्रो लीग हॉकीमधील अप्रतिम कामगिरी सुरू ठेवताना बुधवारी दुसऱ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला.
  • टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारताने सलामीच्या लढतीत फ्रान्सवर 5-0 असा दिमाखदार विजय मिळवला होता.
  • त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दर्जेदार खेळ करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला.
  • भारताकडून जुगराज सिंग, उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, अभिषेक, गुरसाहिबजीत सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग यांनी गोल झळकावले.

विराटने नवा विक्रम नोंदवला :

  • भारतीय क्रिकेट संघ आज बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळत आहे.
  • तर या सामन्यासाठी मैदानात उतरताच माजी कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम रचला आहे.
  • विराटने खास शतक ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • भारतीय भूमीवर 100 वनडे सामने खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • तर विराटने कारकिर्दीतील 259वा वनडे सामना खेळताना ही कामगिरी केली.
  • तसेच पहिल्या वनडेत 8 धावांची खेळी करत विराटने 5 हजार धावा पूर्ण केल्या.

दिनविशेष :

  • जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
  • 1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
  • पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
  • गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.