10 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

मानवी हक्क दिन
मानवी हक्क दिन

10 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 डिसेंबर 2020)

नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर :

 • भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे.
 • तर हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश 200 प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.
 • बंदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम बसवता येईल. पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल.
 • तसेच ‘स्मॅश 200 प्लस’ची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून 120 मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता येईल.
 • भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.
 • भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 डिसेंबर 2020)

पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती :

 • पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थिवने निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.
 • भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत असायचा.
  तर 35 वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत 25 कसोटी, 38 वन-डे आणि दोन टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
 • भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं 194 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे.
 • 2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

फोर्ब्सच्या 100 सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन :

 • ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने 2020 वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील 100 सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा, बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.
 • तर या तिघींचा गेल्या वर्षीच्या यादीतही समावेश होता. यंदाच्या यादीत निर्मला सीतारामन या 41 व्या क्रमांकावर असून, रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 55 वे व किरण मजुमदार-शॉ यांनी 68 वे स्थान पटकावले आहे.
 • तसेच फोर्ब्सच्या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत. मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक 2006 सालापासून कायम राखला आहे.
 • तर त्याला अपवाद 2010 सालाचा होता. त्यावर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हे स्थान देण्यात आले होते. या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्डे या दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी येणार ‘शक्ती’ कायदा :

 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आले आहेत.
 • तर यामध्ये महत्वाचे म्हणजे महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
 • तसेच शक्ती या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविण्यात आले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
 • महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील, असेही निश्चित करण्यात आले.
 • दरम्यान, आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते. जयंत पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने मसुद्यांना अंतिम रूप दिले आहे.

लोकेश राहुल Top 3 मध्ये :

 • ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मैदानात टी-20 मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-20 क्रमवारीत फायदा झालेला आहे.
 • आयसीसीने टी-20 मालिकेनंतर नवीन क्रमवारी जाहीर केली. ज्यात भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची सुधारणा झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला मागे टाकलं.
 • तर कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे.
 • तसेच अंतिम सामन्यात विराटने केलेल्या 85 धावांच्या खेळीचा त्याला चांगला फायदा झाला आहे. तर सांघिक क्रमवारीत टीम इंडियाने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

दिनविशेष:

 • 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
 • सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
 • संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला.
 • सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.