1 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
1 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2022)
देशातील पहिली व्हर्चुअल शाळा सुरू:
- दिल्ली सरकारने राबवलेल्या शैक्षणिक धोरणाचा जगभरात डंका वाजवला जातो.
- त्यात आता दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्चुअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या शाळेत कोणीही प्रवेश घेऊ शकतो. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
- या शाळेच्या माध्यमातून जेईई-एनईईटीसाठी विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
- व्हर्चुअल शाळेमध्ये 9 वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. आजपासून शाळेच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे.
- या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात.
- व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे.
- या शाळेला ‘दिल्ली मॉडेल व्हर्चुअल स्कूल’ असे नाव देण्यात आल्याची माहिती, अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ 13.5 टक्क्यांनी:
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
- यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपी 13.5 टक्क्यांनी वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
- 2021-22 या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी 20.1 टक्क्यांनी वाढला होता.
- पण आरबीआयच्या अंदाजापेक्षा ही जीडीपी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी 16.2 टक्के असेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला होता.
कायद्याच्या दृष्टीने BCCI ला ESI Act च्या तरतुदी लागू :
- सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय आणि राज्य कामगार विमा कायद्यातील तरतुदींसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे.
- कायद्याच्या दृष्टीने बीसीसीआयला राज्य कामगार विमा कायद्यातील (ESI Act) तरतुदी लागू असतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
- तसेच ESI Actमधील तरतुदींचा व्यापक अर्थाने विचार करायला हवा, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.
- न्यायमूर्ती एम आर शाह आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने याबाबतची सुनावणी केली.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धात भारताचा ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश:
- सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने बुधवारी आशिया चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात हाँगकाँगवर 40 धावांनी मात केली.
- सलग दुसऱ्या विजयासह भारताने ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश मिळवला आहे.
- दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 192 अशी धावसंख्या उभारली.
- भारताच्या हार्दिक पंडय़ाला ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-20 क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बढती मिळाली असून त्याने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
दिनविशेष :
- हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला.
- सन 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
- पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात सन 1911 मध्ये भारत गायन समाजाची स्थापना केली.
- 1 सप्टेंबर 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.