1 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

मरिअप्पन थंगवेलू
मरिअप्पन थंगवेलू

1 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2021)

सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांचा शपथविधी :

 • सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नऊ न्यायाधीशांना मंगळवारी झालेल्या सोहळ्यात या पदाची शपथ देण्यात आली.
 • तर त्यामुळे आता या न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे.
 • देशाच्या इतिहासात प्रथमच नऊ न्यायाधीशांनी एकाच वेळी न्यायाधीशपदाची शपथ घेतली.
 • तसेच सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात नऊ न्यायाधीशांना शपथ देण्यात आली त्यात न्या. अभय श्रीनिवास ओक, न्या. विक्रम नाथ, न्या. जितेंद्र कुमार, न्या. माहेश्वरी, न्या. हिमा कोहली व न्या. बी.व्ही नागरत्ना यांचा समावेश आहे.
 • तर या शिवाय न्या. सी. टी. रविकुमार, न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. बेला एम त्रिवेदी , न्या. पी. एस. नरसिंह यांनाही शपथ देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2021)

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीत 20.1 टक्क्यांची वाढ :

 • आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत 20.1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसत आहे.
 • एप्रिल ते जून या काळातील हा जीडीपी आहे. जीडीपी कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती दर्शवत असते.
 • तर गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी उणे 24.4 टक्क्यांनी घसरला होता. जीडीपीची वाढ मोजण्यासाठी या आधीच्या वर्षातील कालवधीची तुलना केली जाते.

वेगवान गोलंदाज डेल स्टेन निवृत्त :

 • जागतिक क्रिकेटमधील फलंदाजांवरही दहशत प्रस्थापित करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
 • तर त्याने 93 कसोटी, 125 एकदिवसीय आणि 47 ट्वेन्टी-20 सामन्यांत आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले.

सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगवेलूनं जिंकलं पदक :

 • भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने उंच उडीत देशासाठी रौप्यपदक पटकावले.
 • मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-63 प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले.
 • याच प्रकारात शरद कुमारने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.
 • तामिळनाडूच्या मरिअप्पनने गेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या टी-42 उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सर्व देशवासीयांची मने जिंकली होती.
 • तर यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्येही रूपेरी कामगिरी करत मरिअप्पनने सलग पॅरालिम्पिक पदक पटकावण्याचा विक्रम केला आहे.

नेमबाज सिंहराज अधानानं जिकलं कांस्यपदक :

 • नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच 1 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
 • तर चीनच्या चाओ यांगने 237.9 गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्ण जिंकले, तर दुसरा चिनी
 • खेळाडू जिंग हुआंगने 237.5 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
 • तसेच सिंहराजने 216.8 गुणांसह कांस्य जिंकले.
 • सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये देशाला नेमबाजीत दुसरे पदक मिळाले आहे.
 • यापूर्वी सोमवारी 19 वर्षीय अवनी लेखरा हिने सुवर्णपदक पटकावले होते.

दिनविशेष :

 • हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला.
 • सन 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
 • पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात सन 1911 मध्ये भारत गायन समाजाची स्थापना केली.
 • 1 सप्टेंबर 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.