1 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

बीएसएनएल
बीएसएनएल

1 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2022)

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान :

  • ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले.
  • विज्ञान भवनात झालेल्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
  • यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की,अधिक चांगला समाज आणि देश घडवण्यामध्ये चित्रपटांचे योगदान मोठे असते.
  • दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा त्याचा प्रभाव अधिक असतो.

युक्रेनचे चार प्रदेश रशियात विलीन :

  • युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
  • युक्रेन, अमेरिका आणि युरोपीय महासंघाने याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
  • आंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून केलेले हे अनधिकृत विलीनीकरण कधीही मान्य करणार नाही, अशी भूमिका पाश्चिमात्य राष्ट्रांनी घेतली.
  • रशियाने युद्ध करून ताब्यात घेतलेल्या डोनेस्क, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरीझिया या युक्रेनच्या प्रांतांमध्ये सार्वमत घेतले होते.
  • या रशियापुरस्कृत सार्वमतामध्ये नागरिकांनी रशियात समावेशाचा कौल दिल्याचा निकाल रशियाधार्जिण्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला.

‘बीएसएनएल’ देशभरात सुरू करणार ‘4जी’ सेवा :

  • भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला 28 हजार कोटींची मदत करणार असून देशभरात लवकरच ‘4जी’ सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
  • ‘बीएसएनएल’ 1 ऑक्टोबरला आपला 23 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे.
  • संस्थेचा गौरवशाली इतिहास असला तरी घटती ग्राहकसंख्या, वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा ताळमेळ राखता न आल्याने ‘बीएसएनएल’ आपल्या अखेरच्या घटका मोजते आहे. त्यामुळे ती बंद होण्याच्या चर्चाही होत्या.
  • मात्र, केंद्र सरकारने नुकतीच 1.64 कोटींची मदत ‘बीएसएनएल’ला केल्याचे पान्हेकर यांनी सांगितले.
  • तर भविष्यात 28 हजार कोटींची मदत केली जाणार आहे.
  • यानुसार देशभरात ‘4जी’ सेवा सुरू केली जाणार आहे.
  • यासाठी आवश्यक असणारे उपकरण हे भारतात तयार केले जावेत, अशी अट टाकण्यात आली आहे.
  • त्यामुळे ‘4जी’ सेवेसाठी आवश्यक असणारे उपकरण तयार करण्याचे काम हे ‘टीसीएस’ला देण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध :

  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सोनेरी यशाला सुरुवात केली.
  • नेमबाजीत रुद्रांक्ष पाटील, तर स्पीड स्केटिंग प्रकारात सिद्धांत कांबळेने सुवर्णपदक मिळविले.
  • कबड्डीत महाराष्ट्राच्या महिलांनी अंतिम फेरी गाठली.
  • अ‍ॅथलेटिक्समध्येही महाराष्ट्राचे धावपटूंची चमक दाखवली.
  • कुस्तीत मात्र, महाराष्ट्राच्या पदरी अपयश पडले.
  • खो-खोमध्येही दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केली.
  • कुमार गटातील जागतिक विजेता नेमबाज रुद्रांक्षने शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राचे पहिले सुवर्णपदक पटकावले.
  • ठाण्याच्या रुद्रांक्षने 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत अचूक वेध साधताना 17 गुणांसह सोनेरी यश मिळविले.

दिनविशेष:

  • 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन आहे.
  • सन 1837 मध्ये भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
  • सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
  • गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला.
  • भारतात 1958 या वर्षापासून दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
  • भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी सन 1959 मध्ये भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.