1 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

महेंद्रसिंह धोनी
महेंद्रसिंह धोनी

1 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2021)

सुईविरहित लशीचा देशव्यापी लसीकरण मोहिमेत लवकरच समावेश :

 • झायडस कॅडिला कंपनीने देशातच विकसित केलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या सुईविरहित लशीचा देशव्यापी लसीकरण मोहिमेत लवकरच समावेश केला जाईल आणि तिची किंमत सध्या वापरल्या जाणाऱ्या लशींपेक्षा वेगळी असेल, असे केंद्र सरकारने सांगितले.
 • तर ही तीन मात्रांची लस असल्याने आणि सुईविरहित पद्धतीने दिली जात असल्याने तिची किंमत सध्या लसीकरण कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लशींपेक्षा वेगळी असेल.
 • तसेच ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या आणीबाणीकालीन वापराची परवानगी मागणाऱ्या भारत बायोटेकच्या अर्जावर ऑक्टोबरमध्ये निर्णय घेतला जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.
 • कोव्हॅक्सिनचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया ‘सध्या सुरू’आहे. भारत बायोटेकने आपल्या लशीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती 19 एप्रिलला सादर केली होती.

मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास होणार अवघ्या 13 तासांत :

 • मुंबई-दिल्ली हा रेल्वे मार्ग देशातील एक वर्दळीचा रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो.
 • तर देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा देशातील एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग म्हणूनही या रेल्वे मार्गाची ओळख आहे.
 • सध्या मुंबई-दिल्ली हे 1386 किलोमीटरचे अंतर राजधानी एक्सप्रेस 16 तासांत पार करते, दुरंतो एक्सप्रेस 17 तास 15 मिनिटांत पार करते.
 • तसेच आता याच मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचा वेग भविष्यात वाढणार आहे.
 • राजधानी एक्सप्रेस सारख्या विशेष गाड्या या ताशी 160 किलोमीटर वेगाने तर सर्वसाधारण गाड्याही 100 किलोमीटर वेगाने सहज धावू शकणार आहेत. यामुळे मुंबई-दिल्ली हे अंतर कमी तासांत पार करणे शक्य होणार आहे.
 • मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड यंत्रणा यांच्यात सुधारणा केल्या जात आहेत. जास्त वेग रहावा यासाठी रेल्वे ट्रॅकच्या संरचनेतही योग्य ते बदल केले जात आहेत.
 • तर यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पुर्ण झाले असून मार्च 2024 पासून या मार्गावर रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रुपिंदर, बिरेंद्रची निवृत्तीची घोषणा :

 • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंग आणि बचावपटू बिरेंद्र लाक्रा यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती जाहीर केली.
 • युवा खेळाडूंना संधी मिळावी, या हेतूने रुपिंदरने हॉकी सोडण्याचा निर्णय ‘ट्विटर’द्वारे जाहीर केला, तर तासाभराच्या अंतराने लाक्राच्या निवृत्तीबाबत ‘हॉकी इंडिया’ संघटनेने निश्चिती केली.
 • देशातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर 30 वर्षीय रुपिंदरने 223 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘बॉब’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुपिंदरने ऑलिम्पिक कांस्यपदक विजयाच्या अभियानात चार महत्त्वाचे गोल झळकावले.
 • तर 31 वर्षीय लाक्रा हा ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचा उपकर्णधार होता.
 • 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाक्राने पदार्पण केले. मग याच वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये अखेरचे स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश होता.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नवा विक्रम :

 • चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
 • आयपीएलमध्ये 100 झेल घेण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नोंदवला गेला आहे.
 • चेन्नईकडून खेळताना महेंद्रसिंह धोनीने 100 झेल घेतले आहेत.
 • यापूर्वी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून हा त्याचा 200वा सामना खेळला होता. चे

दिनविशेष:

 • 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन आहे.
 • सन 1837 मध्ये भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
 • सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
 • गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला.
 • भारतात 1958 या वर्षापासून दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
 • भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी सन 1959 मध्ये भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.