1 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 November 2018 Current Affairs In Marathi

1 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 नोव्हेंबर 2018)

जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताला 66वे स्थान:

  • जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने 66वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने 9 स्थानांची प्रगती केली आहे. या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.
  • नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्याहेनले अँड पार्टनर्स‘ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे. संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. Indian Passport
  • भारतीय पासपोर्टला 66 देशांत मुक्त संपर्काधिकार (अ‍ॅक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल 165 देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे.
  • केवळ 22 देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या 91व्या स्थानी आला आहे. 26 देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच 90 व्या स्थानी आहे. 29 देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया 88व्या स्थानी, तर 34 देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया 87व्या स्थानी आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2018)

नक्षलग्रस्त भागातील सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक:

  • दक्षिण कोरिया येथे 24 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या सहा खेळाडूंनी सात सुवर्णपदके पटकावून विश्वविक्रम केला आहे. हे सर्व खेडाळू गडचिरोली येथे आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
  • तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत 19 देश सहभागी झाले होते. 30 सदस्यीय भारतीय चमूत गडचिरोली जिल्हय़ातील सहा खेळाडूंचा सहभाग होता. यात एंजल देवकुले हिने दोन सुवर्णपदके तर, शेजल गद्देवर, रजत सेलोकरर, संदीप पेदापल्ली, अवंती गांगरेड्डीवार, यशराज सोमनानी यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले.
  • तर हे सर्व खेडाळू गडचिरोली येथे आले असता आतषबाजी व वाद्याच्या गजरात खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. यावेळी सी.एम. चषक जिल्हा संयोजक अनिल तिडके, स्कूल ऑफ स्कॉलरचे प्राचार्य निखिल तुकदेवे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागले:

  • मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. ही अल्प घसरण असली तरी जनतेला यातून थोडाफार दिलासा मिळतोय. परंतु, दरवाढीचा फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घराला बसणार आहे.
  • नोव्हेंबर महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही 59 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात 2.94 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यापासून गॅस दरांमध्ये झालेली हा सलग सातवी वाढ आहे. Gas Cylender
  • नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 880 रुपये असेल. विशेष म्हणजे अनुदानित सिलिंडरवर देण्यात येणारी सूट सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आता ग्राहकांच्या खात्यात 433.66 रुपये जमा होतील. तर ऑक्टोबर 2018 मध्ये ही रक्कम 376.80 पैसे इतकी होती.
    इंडियन ऑइलने सप्टेंबरमध्ये निवेदन प्रसिद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्यामुळे आणि विदेशी मुद्रा विनिमय दरातील चढ-उतार हे सिलिंडरच्या दर वाढीस कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

औषधांच्या ऑलनलाइन विक्रीवर अंतरिम स्थगिती:

  • औषधांच्या ऑलनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. औषध पुरविणाऱ्या सर्व संबंधित कंपन्यांच्या वेबसाइट ब्लॉक करा, असे निर्देश न्यायालयाने संबंधित विभागाला दिले आहेत. तामिळनाडू केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने या विरोधात याचिका दाखल केली आहे.
  • साधारण वस्तूंची ऑनलाइन खरेदी ग्राहकांसाठी सोईची असते, पण औषधे ही मनुष्याच्या आरोग्याशी निगडित असतात. त्यांचे व्यवस्थित सेवन न झाल्यास मृत्युदेखील ओढवू शकतो. याखेरीज ऑनलाइन औषधविक्री करणार्‍या अनेक कंपन्या परवानाधारक नाहीत. त्यांच्याकडून बनावट, वैधता कालावधी संपलेल्या (एक्स्पायरी डेट), दूषित, मान्यता नसलेल्या व सेवनास हानिकारक असलेल्या औषधांचा ग्राहकांना पुरवठा होण्याची भीती आहे, तसेच अशाप्रकारे औषधांची ऑनलाइन विक्री करणे हे देशातील औषध विक्री कायद्याचे उल्लंघन आहे, असे असोसिएशनने याचिकेत म्हटले होते.
  • तर यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या औषध विक्रीला अंतरिम स्थगिती दिली, तसेच यावर केंद्र सरकारने बाजू मांडावी. त्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केंद्राकडून सूचना घ्याव्या व त्या न्यायालयात मांडाव्यात असे, आदेश उच्च न्यायालयाने दिले.

आता व्हॉटस्अ‍ॅप वरही झळकणार जाहिराती:

  • आजवर जाहिरातींपासून अलिप्त असलेले व्हॉटस्अ‍ॅप फेसबुकच्या मालकीचे झाल्यापासून ग्राहकांसाठी सर्वोत्तम संपर्क आणि संदेश सेवा देण्यासाठी नवनवीन फिचर्स सुरू करण्यात येत आहेत. आता कमाईसाठी नवीन पर्यायही शोधत आहेत. आता सर्वसामान्य लोकांसाठी व्हॉटस्अ‍ॅप ‘अ‍ॅडस् ऑन’ हे नवीन फिचर सुरू करणार आहे.
  • व्हॉटस्अ‍ॅपवर जाहिरातींची सुरुवात 2019 पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या फिचरमुळे तुम्हाला स्टेटस सेक्शनवर जाहिराती दिसतील, असे व्हॉटस्अ‍ॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स यांनी सांगितले. व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवर दिसणारी जाहिरात व्हिडिओ स्वरुपात असेल.

अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा:

  • ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. Anupam Kher
  • ‘व्यस्त वेळापत्रका’मुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान होता, असे त्यांनी म्हटले आहे.
  • गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
  • भाजपाच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

दिनविशेष:

  • 1 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक शाकाहार दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1845 मध्ये मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
  • महिलांसाठी पहिले वैद्यकीय सन 1848 मध्ये महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
  • शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1893 मध्ये झाला.
  • सन 1928 मध्ये हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
  • सन 1956 मध्ये भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.
  • 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.
  • सन 1956 मध्ये दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
  • 1 नोव्हेंबर 1956 हा दिवस केरळ राज्य स्थापना दिन आहे.
  • सन 1956 मध्ये कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
  • सन 1966 मध्ये पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Manisha says

    Very nice information for all exam.

Leave A Reply

Your email address will not be published.