1 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

परमबीर सिंग
परमबीर सिंग

1 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 मार्च 2020)

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती :

 • मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्यापदी परमबीर सिंग नियुक्ती केली आहे.
 • तसेच एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी.कनकरत्नम आणि अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांची नावे मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चेत होती. अखेर परमबीर सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 • परमबीर सिंग हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या महासंचालकपदी रूजू होते.
 • आता, मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाल्याने, त्यांच्याजागी लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपीन के. सिंग यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई :

 • उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तर या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिली आहे.
 • गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.
 • तसेच उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.
 • दरम्यान दिल्ली पोलिसांना आतापर्यंत हिंसा घडविणाऱ्यांची एक हजार जणांची ओळख पटली आहे. यापैकी 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसेत झालेल्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र रविवार ते बुधवार या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण :

 • मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
 • तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुरुवातीला शिक्षणासाठी हे आरक्षण दिले जाईल आणि नोकऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. या आरक्षणास शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
 • तसेच विधानपरिषदेत शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा केली.
 • मुस्लिम समाजाला 9 जुलै 2014 रोजी अध्यादेश काढून पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम आदेशाद्वारे शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण वैध ठरविले, तर नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली. पण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न झाल्याने 23 डिसेंबर 2014 रोजी अध्यादेश संपुष्टात आला.
 • मात्र न्यायालयाने आरक्षण लागू काळातील शिक्षण संस्थांमध्ये दिले गेलेले प्रवेश आणि नोकऱ्या अबाधित ठेवल्या असून प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढून नोकऱ्यांमध्ये ते देण्याबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय :

 • पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिलाखासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 • संसदेतीलमहिला समितीने संसदीय परिसरात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सांगितले आहे. आयएनएसने पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार हवाला देताना म्हटलं आहे की, हा मुद्दा महिला खासदारांनी उपस्थित केला होता.
 • तर त्यांनतर संसद भवन गृहनिर्माण समितीची बैठक झाली. आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू केले जाईल.
 • इतकेच नव्हे तर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी ब्युटी पार्लर का उघडले नाही, यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (सीडीए) फटकारले आहे.
 • तर समितीच्या संयोजकांना संसद परिसरात ब्युटी पार्लरसाठी जागा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे देशात आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा खासदार जनतेचे पैसे ब्युटी पार्लरवर उडवणार असल्याच्या निर्णयावरून तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिनविशेष:

 • एक मार्च हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन‘ आहे.
 • यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना सन 1872 मध्ये झाली होती.
 • सन 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
 • महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे 1 मार्च 1922 रोजी जन्म झाला.
 • आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास 1947 या वर्षी पासून सुरूवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.