1 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs

केन विल्यमसन
केन विल्यमसन

1 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 जानेवारी 2021)

‘ईपीएफ’वरील व्याज आजपासून खात्यात :

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणारे 2019-20 साठीचे वार्षिक व्याज 8.5 टक्केच कायम राहणार आहे.
  • तर हे व्याज 1 जानेवारी 2021 कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) 6 कोटी सदस्यांना 8.5 टक्के व्याजदर देण्याबाबतची केंद्रीय कामगार खात्याची शिफारस अर्थ विभागाने मान्य केली आहे.
  • कामगारमंत्री संतोष गंगवार हे अध्यक्ष असलेल्या संघटनेने याबाबत सर्वप्रथम मार्च 2020 मध्ये शिफारस केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2020)

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू :

  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.
  • तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.
  • एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली 2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • चीनचे के झोंग शानशान यांनी पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • तर भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.
  • ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती 70.9 अब्ज डॉलरपासून 77.8 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.
  • तसेच शानशान जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

अजिंक्य रहाणेचीही क्रमवारीत मोठी झेप :

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने वर्षाअखेरीस नवी क्रमवारी जाहीर केली आहे.
  • तर गेल्या काही सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला फायदा झाला असून त्याने स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं.
  • 890 गुणांसह विल्यमसन पहिल्या स्थानावर असून स्मिथ पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
  • याव्यतिरीक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहचला आहे, तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी पोहचला आहे.

दिनविशेष:

  • सन 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
  • बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सन 1842 मध्ये सुरू झाले.
  • महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
  • 1 जानेवारी 1862 पासून इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
  • भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सत्येंद्रनाथ बोस‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला होता.
  • सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक ‘कमलाकांत वामन केळकर‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1902 मध्ये झाला होता.
  • 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.