1 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 January 2019 Current Affairs In Marathi

1 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 जानेवारी 2019)

‘2019’ नववर्षाचे जल्लोषात स्वागत:

 • सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे सोमवारी मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. Happy New Year
 • 31 डिसेंबरला पब, बार आणि हॉटेल्स रात्रभर सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यामुळे मुंबईतील गिरगाव चौपाटी, कुलाबा, जुहू, शिवाजी पार्क येथे मुंबईकरांनी मनसोक्त मजा लुटली. देशाच्या अन्य भागांमध्येही जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
 • नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी सोमवारी रजा घेतली होती किंवा अर्धा दिवसाची सुट्टी घेत घरी धाव घेतली. रात्री मुंबईतील किनारे गर्दीने खचाखच भरले होते. दरम्यान, नववर्षाचे स्वागत होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज होते.
 • राज्यभरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत तब्बल 40 हजार पोलिसांचा पहारा होता. तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही सज्ज होते. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत. यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवून होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2018)

केंद्र सरकारव्दारे नव वर्षात सिलेंडर स्वस्त:

 • केंद्र सरकारने नव्या वर्षाचे पहिले गिफ्ट जनतेला दिले आहे. विनाअनुदानित सिलिंडर आता 120 रुपये 50 पैसे स्वस्त झाला आहे. तर अनुदानित सिलिंडर 5 रुपये 91 पैसे स्वस्त झाला आहे. दर कपात झाल्याने अनुदानित सिलिंडर हा 500 रुपये 90 पैशांऐवजी 494 रुपये 99 पैशांना मिळणार आहे.
 • एलपीजी गॅस सिलिंडरचे दर महिन्याभरात दुसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 120 रुपये 50 पैशांनी कमी करण्यात आली आहे.
 • IOC ने या संदर्भातली घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मृती मानधना ठरली यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू:

 • भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. Smriti Mandhana
 • वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.
 • तसेच 22 वर्षीय स्मृतीला 2018च्या ICCच्या यंदाच्या टी-20 आणि एकदिवसीय संघातही स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.
 • स्मृतीने वर्षभरात 12 एकदिवसीय सामन्यात 67च्या सरासरीने 669 धावा केल्या. तर 25 टी-20 सामन्यांत सुमारे 130च्या स्ट्राईक रेटने 622 धावा लगावल्या. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
 • तर या स्पर्धेत तिने 5 सामन्यांत 125.35 च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या होत्या. ICC च्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय आणि टी-20 क्रमवारीतही ती अनुक्रमे चौथ्या व 10व्या स्थानी आहे.

परदेशी पर्यटकांना थेट अंदमानला जाण्याचा पर्याय:

 • परदेशी पर्यटकांकडून मोठी पसंती असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर विमानतळाला वैध कागदपत्रांसह देशात प्रवेश करण्यासाठी तसेच देशाबाहेर जाण्यासाठी मान्यताप्राप्त इमिग्रेशन चेकपोस्टचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांना थेट अंदमान निकोबारला जाण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
 • पासपोर्ट कायदा 1950च्या कलम 3ब अनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.
 • अन्य एका अधिसूचनेव्दारे पोलिस अधीक्षक, सीआयडी, अंदमान निकोबार पोलिस यांना पोर्ट ब्लेअर येथील इमिग्रेशन चेकपोस्टसाठी नागरी प्रशासनाचा दर्जा देण्यात आला असून 31 डिसेंबर 2018 पासून तो लागू झाला आहे.
 • अंदमान निकोबार व्दीपसमूहातील एका बेटावरील अत्यंत संरक्षित प्रजातीच्या सदस्यांकडून एका अमेरिकन पर्यटकाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर महिनाभरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

टपाल खाते नववर्षात विविध उपक्रम राबविणार:

 • देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स ऑफ स्टॅम्पहा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे.
 • मुंबईत दरवर्षी अनेक महोत्सव होतात. अशा महोत्सवांमध्ये टपाल खाते आपल्या स्टॅम्पबाबत माहिती देऊन जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी दिली. Indian Post
 • काळाघोडा महोत्सवासह विविध महोत्सवांमध्ये टपाल खाते आपला स्टॉल लावून टपाल तिकिटांबाबत नागरिकांना सजग करेल. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तुंना स्टॅम्पचे आवरण लावून अधिकाधिक जणांना याकडे आकर्षित करण्यात येणार आहे.
 • टपाल खात्याच्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय मुत्सद्दीपणा‘ या थीमवर नोटबुकच्या पॅटर्नमध्ये डायरी बनविण्यात येणार आहे. टपाल तिकिटे ही देशातील घटनांचा आरसा असतात. भारतीय इतिहासाचे डॉक्युमेंटशन याद्वारे नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टार जनरल स्वाती पांडे यांनी स्पष्ट केले.
 • मुंबई विभागाच्या टपाल खात्याच्या संचालिका केया अरोरा म्हणाल्या, ‘फिलॅटॅली विभागातर्फे आम्ही विविध तिकिटांचे प्रदर्शन भरविण्याचा आमचा मनोदय आहे‘. यासाठी विविध कल्पक योजना राबवून तरुणांपर्यंत पोहोचणार आहोत.

दिनविशेष:

 • सन 1756 मध्ये निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
 • बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सन 1842 मध्ये सुरू झाले.
 • महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
 • 1 जानेवारी 1862 पासून इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
 • विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
 • भारतीय भौतिकशास्त्रज्ञसत्येंद्रनाथ बोस‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी झाला होता.
 • सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
 • भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिककमलाकांत वामन केळकर‘ यांचा जन्म 1 जानेवारी 1902 मध्ये झाला होता.
 • 1 जानेवारी 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
 • चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.