1 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2020)

‘ब्रह्मपुत्रा’वर चीन बांधणार महाकाय धरण :

 • दक्षिण आशिया खास करुन भारताला लागून असलेल्या सिमेवर चीन मोठ्या जोमाने विकासकामं हाती घेताना दिसत आहे. आता चीनने लवकरच तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर म्हणजेच यारलुंग जांगबो नदीवर भारतीय सिमेजवळ मोठं धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तर हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठं धरण असणाऱ्या थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • तिबेटमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेतून भारतामध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला सियांग या नावाने ओळखलं जातं.
 • अरुणाचलमधून ही नदी आसाममध्ये प्रवेश करते जिथून तिला ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं. आसाममधून ही नदी बांगलादेशच्या हद्दीत प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारतातील राज्यांबरोबर बांगलादेशमधील प्रमुख नदी आहे. लाखो लोकांची उपजिविका या नदीवर अवलंबून आहे.

तीव्र संसर्ग रोखण्यात लस 100 टक्के परिणामकारक :

 • आपण विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस परिणामकारक असल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना औषधनिर्मिती कंपनीने केला असून ही कंपनी लवकरच लशीच्या आपत्कालीन वापराची परवानगी अमेरिका आणि युरोपीय संघाच्या नियामकांकडे मागणार आहे.
 • आपण विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस 94.1 टक्के परिणामकारक असल्याचे आणि लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम उद्भवले नसल्याचे मॉडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.
 • ‘मॉडर्ना’ने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट्स ऑफ हेल्थच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे.
 • तर या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांमध्ये ही लस 94.5 टक्के परिणामकारक ठरली होती.

युपीनंतर आता मध्य प्रदेश सरकार आणणार ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा :

 • उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारही जबरदस्तीनं धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायदा आणणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची घोषणा केली.
 • तसेच उत्तर प्रदेशमध्ये नुकताच हा अध्यादेश लागू झाला असून त्याअंतर्गत एक अटकही झाली आहे.
 • उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लग्नाच्या आमिषानं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल अनंदीबेन पटेल यांनी मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेनंतर हा अध्यादेश राज्यात लागू झाला.

दिनविशेष:

 • 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
 • एस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
 • सन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.
 • 1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.
 • सन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.