1 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 December 2018 Current Affairs In Marathi

1 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2018)

272 उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘मोफत वायफाय’:

 • चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह  स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि 2020 पर्यंत अंतराळात असे 10 उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे.
 • 2026 पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे 272 उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून  संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल. Free Wifi
 • कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई  होऊ शकेल.
 • चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे  नेटवर्क जाईल.
 • एका अहवालानुसार, जगातील 300 कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात 7 हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या  काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे 1600 उपग्रह अंतराळात पाठवणार आहे.
 • स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड  वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.

अभिनव बिंद्राला ISSF कडून मानाचा ब्लू क्रॉस पुरस्कार:

 • भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देशाची मान आणखी एकदा उंचावली आहे. 36 वर्षीय अभिनवला ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना) कडून  मानाचाBlue Cross पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
 • नेमबाजी क्षेत्रात ब्लू क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
 • नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल  अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल अभिनवनेही आतापर्यंत आपल्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
 • बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह, अभिनव बिंद्राने 2006 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदकही पटकावले होते. याव्यतिरीक्त 7 राष्ट्रकुल खेळांची पदके आणि 3  आशियाई खेळांची पदकंही अभिनवच्या नावावर जमा आहेत. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केला  आहे.

नेहा नारखेडे अमेरिकेतील टॉप टेक महिलांमध्ये:

 • फोर्ब्सने नुकतीच 2018 या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप 50 महिलांची यादी जाहीर केली आहे.
 • जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. Neha
 • कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे  चित्र आहे.
 • नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या  सहसंस्थापक आहेत.
 • सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 • तर नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत. नारखेडे यांचे वय अवघे 32 असून त्यांनी या यादीत 35व्या स्थान पटकावले आहे.

अनुदानित सिलिंडर तसेच विनाअनुदानित सिलिंडर स्वस्त:

 • अनुदानित सिलिंडर 7 रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
 • दिल्लीत या संदर्भातली घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत अनुदानित सिलिंडर हा दिल्लीत 507 रुपये 42 पैशांना मिळत होता जो आता 500 रुपये 90 पैशांना मिळणार आहे.
 • विनाअनुदानित सिलिंडर हा 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत हा सिलिंडर 942 रुपये 50 पैशांना मिळत होता जो आता 809 रुपये आणि 50 पैशांना मिळणार आहे.
 • तसेच नव्या किंमती 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू होणार:

 • मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
 • विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर दिले आहे. सरकारच्या निर्णयामुळे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सहा लाख निवृत्त  कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
 • केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. केंद्राने लागू केला तेव्हापासून राज्यात देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी काही  कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले होते.
 • त्यावर सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. येत्या 5 डिसेंबरला के.पी. बक्षी समिती अहवाल सादर करणार असून सातवा वेतन आयोग मात्र येत्या एक जानेवारी 2019 लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.

अजय भूषण पांडे भारताचे नवे अर्थ सचिव:

 • देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. Ajay Pande
 • पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
 • देशात बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणून आधार विकसित करण्यात अजय भूषण पांडे यांचा मोठा सहभाग आहे. मागील 8 वर्षांपासून ते प्रोजेक्टशी संलग्न आहेत. त्याचबरोबर आधारला बँक खात्याशी जोडून सर्वसामान्य नागरिकाला सरकारी फायदे मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. आधारकार्डचे महत्व सर्वोच्च न्यायालयात पटवून देण्यात देखील त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
 • अजय भूषण पांडे हे आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी ट्रान्समिशन व वितरणात होणारी गळती थांबविण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबविल्या होत्या.
 • तसेच महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे.

दिनविशेष:

 • 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म  कंपनीची स्थापना केली.
 • एस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
 • सन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.
 • 1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.
 • सन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.