1 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
1 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2022)
समाजमाध्यमांवर तिरंग्याचे छायाचित्र ठेवण्याचे आवाहन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले, की स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जाणाऱ्या ‘अमृत महोत्सवा’स एका व्यापक लोकचळवळीचे रूप येत आहे, समाजाच्या सर्व स्तरांतील आणि वर्गातील नागरिक त्यात सामील झाले आहेत.
- तिरंगा ध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची 2 ऑगस्ट ही जयंती आहे, त्यामुळे 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या विविध समाजमाध्यम खात्यावर तिरंग्याचे छायाचित्र ‘प्रोफाइल पिक्चर’ म्हणून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
- मोदींच्या आकाशवाणीवरील मासिक संवादसत्र ‘मन की बात’च्या 91 व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला आणि 13 पासून 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकावून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
- मोदींनी सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या योद्धय़ांना अभिवादन केले आणि ‘अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत देशभरात आयोजित विविध कार्यक्रमांचा उल्लेख केला.
Must Read (नक्की वाचा):
भारताची वेटलिफ्टिंगपटू बिंद्याराणी देवीला रौप्यपदक :
- भारताची वेटलिफ्टिंगपटू बिंद्याराणी देवीने महिलांच्या 55 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे भारताचे चौथे पदक ठरले.
- मीराबाई चानूच्या सुवर्ण कामगिरीनंतर 23 वर्षीय बिंद्याराणीने एकूण 202 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकले.
- क्लीन अँड जर्क प्रकारात 116 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
- त्यापूर्वी स्नॅचमध्येही तिने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात वेटलिफ्टिंग जेरेमीला सुवर्ण :
- युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दोन विक्रम मोडीत काढत भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
- 2018च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 160 किलो असे एकूण 300 किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.
- सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने कांस्यपदक मिळवले.
- 19 वर्षीय जेरेमीने स्नॅच आणि एकूण वजन या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला.
भारताची पाकिस्तानवर सरशी :
- सलामी फलंदाज स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर आठ गडी आणि 38 चेंडू राखून दिमाखदार विजय मिळवला.
- पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला.
- पाकिस्तानने दिलेले 100 धावांचे लक्ष्य भारताने 11.4 षटकांतच 2 गडय़ांच्या मोबदल्यात गाठत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
- भारताचा पुढील सामना 3 ऑगस्टला बार्बाडोसशी होणार आहे.
14 वर्षीय अनाहतने राष्ट्रकुल स्पर्धेत रचला इतिहास :
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 14 वर्षीय स्क्वॉशपटू अनाहत सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
- अनाहत ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू ठरली आहे.
- अनाहतने शुक्रवारी महिला एकेरीच्या 64 राउंडमध्ये वयाने आपल्यापेक्षा फार मोठ्या असलेल्या जेसा रॉसला सलग तीन गेममध्ये पराभूत केले.
- स्क्वॅशमध्ये आल्यानंतर अल्पावधीतच अनाहतने 11 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आली.
- 2019मध्ये ब्रिटिश ओपनमध्ये 11 वर्षांखालील गटात तिने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
- त्याच वर्षी आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली.
- अनाहताने या वर्षी जूनमध्ये थायलंड आशियाई ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये 15 वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले होते.
दिनविशेष :
- 1 ऑगस्ट 1774 मध्ये जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
- 1 ऑगस्ट 1876 मध्ये कोलोरॅडो अमेरिकेचे 38 वे राज्य बनले.
- इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी 1 ऑगस्ट 1960 मध्ये झाली.
- 1 ऑगस्ट 1981 मध्ये अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट 1994 मध्ये विमा योजना लागू झाली.
Thank you🌹🙏