1 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 August 2018 Current Affairs In Marathi

1 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2018)

अमेरिकेकडून भारताला ‘एसटीए-1’ दर्जा:

 • अमेरिकेने भारताचा समावेश ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1‘ (एसटीए) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेज सिंह सरना यांनी दिली.
 • अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी 30 जुलै रोजी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सरना म्हणाले, ‘अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून, आर्थिक व संरक्षण क्षेत्रांतील एक भागीदार या नात्याने भारताच्या क्षमतेला दिलेली एकप्रकारची मान्यताच आहे. या निर्णयामुळे उभय देशातील द्विपक्षी, तसेच संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील.’
 • अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण बदल असून, भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विल्बर रॉस स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने 2016 मध्ये भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती. STA India-USA
 • जगभरातील 35 देशांना अमेरिकेचाएसटीए-1 दर्जा प्राप्त असून, आता भारतही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे. नाटोचे सदस्य असलेल्या बहुतांशी देशांनाही यात स्थान देण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 जुलै 2018)

आशियाई स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले:

 • आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक या ना त्या कारणाने वाढतच आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बोट रेसिंग संघाच्या समावेशाचे आदेश दिले आहेत.
 • भारतीय ऑलिंपिक संघटनेने या संघाला प्रवेश नाकारला होता. त्यानंतर संघातील एक खेळाडू अभय सिंग याने दिल्ली उच्च न्यायालयात ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ऑलिम्पिक संघटनेने बोट संघाने निवडीचे निकष पार न केल्याचे कारण दिले होते.
 • यालाच अभयने आव्हान दिले होते. या संदर्भातील याचिकेवर 30 जुलै रोजी सुनावणी घेतली होती. त्या वेळी त्यांनी अभयच्या बाजूने निर्णय देत भारतीय ऑलिंपिक संघटनेला या संघाच्या समावेशाचे आदेश दिले.
 • न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ऑलिंपिक संघटनेने तातडीने बोट संघाची प्रवेशिका पाठविल्याचे संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपवरही आता ग्रुप कॉलची सुविधा उपलब्ध:

 • व्हॉट्सअॅपने व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलपाठोपाठ आता ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध केली आहे. व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली असून, त्याद्वारे एकाच वेळी कमाल चार जणांना परस्परांशी संवाद साधता येईल.
 • आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध आहे. जगभरातील दीड अब्ज युजर्सना ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
 • ‘कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी कमाल चार युजर्सना परस्परांशी ग्रुप कॉलद्वारे संवाद साधता येईल. त्यासाठी प्रथम एका व्यक्तीला व्हॉइस किंवा व्हिडीओ कॉल करून, त्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या ‘अॅड पार्टिसिपंट’ या नवीन बटणावर क्लिक केल्यास इतर युजर्सना या कॉलमध्ये समाविष्ट करता येईल,’ असे व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. mpsc whatsapp group
 • ग्रुप कॉल हे एंड-टू-एंड इन्क्रीप्टेड आहेत. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये काम करण्याच्या दृष्टीने या कॉलिंग फीचरची रचना करण्यात आली आहे, असे व्हॉटस्अॅपचे म्हणणे आहे. मे महिन्यात झालेल्या फेसबुक एफ-8 विकासकांच्या परिषदेमध्ये व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंगची सुविधा देण्याची घोषणा केली होती.

सरकारी नोकरीत मराठा समाज 14 टक्के:

 • राज्यातल्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मराठा समाजाची संख्या जवळपास 14 टक्‍के असल्याचे उघड झाले.
 • राज्यातील एकूण 11 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये याचे प्रमाण 14 टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे. त्यापैकी सरकारी नोकरीतील ‘अ’ वर्गातील नोकरी पटकावण्यास मात्र मराठा समाज पिछाडीवर दिसत आहे. केवळ साडेचार टक्‍के (नऊ हजार) मराठा अधिकारी सरकारी नोकरीत उच्च पदावर आहेत. असा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • या अहवालानुसार राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व एकूण दोन लाख असल्याचे या अहवालात उघड झाले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारला सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे, याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तो अहवाल राज्य सरकारने आयोगाला सादर केला आहे.
 • तसेच या अहवालानुसार पोलिस खात्यात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व सर्वाधिक दिसून आले आहे. राज्यातील एक लाख 83 हजार पोलिस शिपायांमध्ये मराठा समाजातील पोलिस शिपायांची संख्या 42 हजार आहे.

15 ऑगस्टसाठी पंतप्रधान मोदींनी मागवल्या कल्पना:

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणात तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवरील भाष्य अपेक्षित आहे? याबाबतचे तुमचे मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकणार आहात. स्वत: पंतप्रधानांनीच तसे आवाहन केले आहे. Narendra Modi
 • गेली काही वर्षं पंतप्रधानांनी असे लोकांकडून थेट सूचना मागवणे सुरू केले आहे. न्यू इंडिया संदर्भातले आपले स्वप्न किंवा उद्दिष्ट देखील लोक मांडू शकतात. यापैकी निवडक सूचनांचा पंतप्रधानांच्या 15 ऑगस्टच्या भाषणात समावेश करण्यात येणार आहे.
 • तसेच या सूचना नरेंद्र मोदी अॅपवर देता येतीलच, शिवाय mygov.in या संकेतस्थळावर http://nbt.in/1Fy_Wa या विशेष पानावरील कमेंट बॉक्समध्येही देता येतील.

दिनविशेष:

 • 1 ऑगस्ट 1899 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म झाला होता.
 • हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीमीना कुमारी‘ यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 मध्ये झाला होता.
 • सन 1960 मध्ये इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
 • भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना 1 ऑगस्ट 1994 पासून लागू झाली.
 • 1 ऑगस्ट 2004 रोजी सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2018)

You might also like
2 Comments
 1. rajput gulab mahadev says

  solapur university establ 1/08/2004

  1. Sandip Rajput says

   Mafi asawi.. Dhanyawaad.. Correction sangitlyabaddal..

Leave A Reply

Your email address will not be published.