1 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारताची स्पाइस 2000 बॉम्ब खरेदी करण्याची योजना:
भारताची स्पाइस 2000 बॉम्ब खरेदी करण्याची योजना:

1 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 जुलै 2020)

भारताची स्पाइस 2000 बॉम्ब खरेदी करण्याची योजना:

  • भारताची स्पाइस 2000 बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे.
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस 2000 बॉम्बने नष्ट करण्यात आला होता. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
  • तर एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. एअरफोर्सकडे स्पाइस 2000 बॉम्ब आहेत.
  • भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जून 2020)

देशातल्या 80 कोटी जनतेला होणार लाभ- धान्य मोफत दिलं जाणार:

  • 30 नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • याचा लाभ देशातल्या 80 कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
  • एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला:

  • चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला. त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग 23 वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.
  • चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. सुत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
  • हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग 1997 पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे.

करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे:

  • करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे.
  • भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.
  • जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली.
  • एसएआरएस-सीओव्ही -2 स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले.
  • हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.
  • भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज 1 आणि फेज 2 मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

जाडेजाला Most valuable player म्हणून घोषित- Wisden :

  • भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • Wisden ने जाडेजाला 21व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे.
  • तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने जाडेजाचं नाव घोषित केलं आहे. 97.3 गुण मिळवत जाडेजाने हा मान पटकावला आहे.

पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली:

  • पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे.
  • मात्र हे औषध करोना बरं करणारं औषध म्हणून विकता येणार नाही. तर प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध म्हणून विकता येईल. असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे

दिनविशेष :

  • 1 जुलैमहाराष्ट्र कृषिदिन
  • 1 जुलैभारतीय वैद्य दिन
  • मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना 1 जुलै 1934 मध्ये यश आले.
  • 1 जुलै 1947 मध्ये फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
  • सोमालिया व घाना हे देश 1 जुलै 1960 मध्ये स्वतंत्र झाले.
  • रवांडा व बुरुंडी हे देश 1 जुलै 1962 मध्ये स्वतंत्र झाले.
  • 1 जुलै 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.