विष्णुदास भावे पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

विष्णुदास भावे पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

 • यंदाचा 53वा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना 5 नोव्हेंबर 2018 रोजी (मराठी रंगभूमी दिन) प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह अनई 25 हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

vishnudaas bhave puraskar 2018

डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकीर्दीविषयी माहिती –

 • जन्म: 23 जुलै 1947 (भौर, पुणे.)
 • शिक्षण: एमबीबीएस (बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे.), शिक्षणानंतर मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.

अभिनय कारकीर्द –

 • नाटक: ‘धन्य मी कृतार्थ मी’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘तीन चोक तेरा’, ‘वसांशी जिर्णाणी’, ‘सवार रे’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘घाशीराम कोतवाल’.
 • चित्रपट: 1974 साली प्रदर्शित झालेल्या ‘सामना’ या मराठी चित्रपटापासून कारकीर्दीस सुरुवात, यानंतर ‘निशांत’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘आक्रोश’, ‘मशाल’, ‘पारं’, ‘कासव’, ‘देऊळ’, ‘जॉली एलएलबी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हीरो’ अशा हिन्दी, मराठी, बंगाली भाषांमधील 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय कारकीर्द.
विष्णुदास भावे पुरस्कारविषयी माहिती –
1. सन 1959 पासून दरवर्षी 5 नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिनी अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती, सांगलीव्दारे हा पुरस्कार प्रदान केला जातो. पहिला पुरस्कार बालगंधर्व यांना प्रदान करण्यात आला.
2. विष्णुदास भावे पुरस्कारप्राप्त व्यक्ती: डॉ. जब्बार पटेल (2014), विक्रम गोखले (2015), जयंत सावरकर (2016), मोहन जोशी (2017).
 • 1997 ते 2002: भारतीय चित्रपट टेलिव्हीजन संस्थेचे (Film Television Institute of India – FTII) अध्यक्ष.
 • 1990: पद्मशी पुरस्कार.
 • 1996: संगीत नाटक अकादमी पुरस्कार.
 • 1998: पुणे प्राईड पुरस्कार.
 • 2002: ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी पुरस्कार.
 • 2004: Goethe पुरस्कार.
 • 2013: 93व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. बारामती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.