विज्ञान व तंत्रज्ञान संकीर्ण घडामोडी 1 बद्दल माहिती

विज्ञान व तंत्रज्ञान संकीर्ण घडामोडी 1 बद्दल माहिती

  • भारतीय बनावटीचे हलक्या वजनाचे ‘तेजस’ लाढाऊ विमान चालविणारे हवाई दलाचे प्रमुख अरुप रहा हे पहिले अधिकारी होय.
  • स्वदेशी बनावटीचे हलके हेलिकॉप्टरने 70 मिमी व्यासाचे रॉकेट यशस्वीरित्या डागण्यात आले (14 मार्च 2016)
  • भारतात हवेतून मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व इस्त्राइल कंपनी राफेल अॅडव्हान्सड सिस्टिम्स कंपनी यांच्यात करार झाला (30 मार्च 2016) हा संयुक्त प्रकल्प इंदौर येथे उभारण्यात येणार आहे.
  • सॅमसंग इंडिया, इलेक्ट्रॉनिक्सने (सॅमसंग गॅलक्सी जे-3 हा संपूर्णपणे भारतात बनविलेला पहिला स्मार्टफोन होय. सॅमसंग ही दक्षिण कोरियन कंपनी आहे.
  • शाहीन -व्ही -चीन आणि पाकिस्तान हवाई दलाचा संयुक्त सराव.
  • रशियाचे अंतराळवीर युरी गागरीन यांनी 1961 मध्ये अंतराळयानातून अवकाशात भरारी घेतली होती. या घटनेला 2016 मध्ये 55 वर्ष पूर्ण झाली.
  • भारत आणि अमेरिका यांच्या संरक्षणविषयक करार होऊन (12 एप्रिल 2016) त्यानुसार  दोन्ही देशाचे लष्कर परस्पराची लष्करी सामग्री, विमानतळ वापरू शकणार आहेत.
  • फेसबुक मेसेंजर अॅप ‘बोट’ मार्फत चालवले जाणार आहे. बोट हे विशिष्ट प्रकारचे इंटरनेट रोबोट असून ते विशिष्ट सांकेतिक प्रणालीव्दारे चालवले जातात.
  • भारतीय हवाई दलातील पहिले आणि एकमेव ‘फाइव्ह स्टार’ रॅमचे अधिकारी मार्शल ऑफ दि एअर फोर्स अर्जनसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त (97 वर्ष) पं. बंगालमधील हवाई दलाच्या पानगड तळाला त्यांचे नाव देण्यात आले.
  • भारत 36 राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून खरेदी करणार.
  • भारत व चीन लष्करादरम्यान हॉटलाइन सुरू करण्यात आली. (20 एप्रिल 2016)
  • भारत व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर लेझर वॉल कार्यान्वित करण्यात आली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.