विदेश दौरे भाग 6 बद्दल संपूर्ण माहिती

विदेश दौरे भाग 6 बद्दल संपूर्ण माहिती

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा इस्त्राईल दौरा

दिनांक : 18, 19 जानेवारी रोजी.

 • सुषमा स्वराज यांचा हा इस्त्राईल पहिलाच दौरा होता.
 • इस्त्राईलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांची भेट (18 जाने. 2016) रोजी झाली.
 • इस्त्राईल बरोबरील संबंध सर्व बाजूंनी विकसित व्हावे हे भारताचे धोरण, विज्ञान-तंत्रज्ञान, सायबर, संरक्षण, कृषी क्षेत्रात परस्पर सहकार्य होईल.

 

भारत व संयुक्त अरब अमिराती दरम्यान करार

 • अबुधाबीचे युवराज शेख महंमद ब्रिन झायेद नट्ट्यान यांचा भारत दौर्‍या दरम्यान संरक्षण, ऊर्जा, व्यापार संदर्भात करार झाले.
 • संयुक्त अरब अमिराती भारतात 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार.
 • भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत आहे. तर संयुक्त अरब अमिराताशी भारताचा सुमारे 60 अब्ज डॉलरचा व्यापार आहे.
 • युएई च्या दृष्टीकोनातून भारत हा दुसर्‍या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. भारताला तेल निर्यात करणार्‍या देशामध्ये तो 6 व्या क्रमांकावर आहे.
 • पश्चिम आशियाई देशबरोबरील भारताच्या व्यापारामध्ये ‘यूएई’ पहिल्या स्थानावर आहे.
 • ऑगस्ट 2015 मध्ये नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती (युएई) च्या दौर्‍यावर गेले होते. 34 वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांनी या देशाला भेट दिली होती. नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम आशिया दौर्‍याची सुरुवात (युएई) पासून झाली होती.
 • युएई ही पश्चिम आशियातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था वेगवेगले प्रयोग करत असते. यामध्ये पर्यावरण पाणी बचत, पाणी पुर्नवापर, स्वच्छता, स्मार्ट सिटी, स्वच्छता या संदर्भातील प्रयोगांचा समावेश होतो. या देशाकडे 800 अब्ज डॉलर इतकी प्रचंड साधन संपत्ती निधी आहे.
 • येथील एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्या भारतीयांची आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.