विदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
विदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम, अमेरिका, सौदी अरेबिया दौरा
- बेल्जियम – 30, 31 मार्च 2016. तेराव्या भारत-युरोपीय समुदाय परिषदेत उपस्थित होते.
- अमेरिका – 31 मार्च ते 1 एप्रिल, अणुसुरक्षा शिखर बैठकीसाठी उपस्थित होते.
- तसेच सौदी अरेबिया – 2 ते 3 एप्रिल रोजी उपस्थित होते.
- भारत आणि बेल्जियम या देशांच्या संयुक्तपणे उभारलेल्या दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले. (30 मार्च 2016) उत्तराखंडामधील नैनितालजवळ देवस्थळ येथे आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेल्जियम पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी रिमोट कंट्रोलव्दारे या दुर्बीणीचे लोकार्पण केले.
- दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, व्यापार या संबंधी चर्चा झाली होती.
- या दुर्बीणीचे नाव एरियस असे आहे.
- भारत व अमेरिका दरम्यान गुरुत्व तरंग वेधशाळा करार झाला.
- अणुसुरक्षा परिषद वाशिंग्टन येथे झाली. या परिषदेत 53 देशांचा सहभाग होता.
- बेल्जियम मधील अॅटीवर्प जगातील सर्वात मोठे हिरा व्यापार केंद्र आहे.
- (जगातील 84% कच्चे हिर्याची उलाढाल या केंद्रातून होते) या केंद्रास नरेंद्र मोदींनी भेट दिली होती.
- भारतात गुरुत्वीय लहरी वेधशाळा सुरू करण्याबाबत अमेरिकेशी करार करण्यात आला. करारानुसार ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झवेंटरी म्हणजे लायगो हे उपकरण भारतात बसवण्यात येणार आहे.
- गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्राच्या संशोधनात हे उपकरण महत्वाची भूमिका पार पाडते.
- या दौर्या दरम्यान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबिया देशाचा दौरा केला होता. सौदी अरेबिया देशाचे राजे किंग सलमान बिन अब्दुल अझिझ यांची भेटी दरम्यान नरेंद्र मोदींनी व्यापार, गुंतवणूक, दहशतवाद संबंधी चर्चा केली.