विदेश दौरे भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
विदेश दौरे भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती
राष्ट्रपतीचा न्यूझीलंड दौरा
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 30 एप्रिल न्यूझीलंड देशाला भेट दिली.
- दौर्या दरम्यान दोन्ही देशामध्ये मुक्त व्यापार संदर्भात चर्चा झाली.
- आंतरराष्ट्रीय व्यापारात चीन न्यूझीलंडचा मोठा भागीदार आहे.
- न्यूझीलंडचे राष्ट्राध्यक्ष जेरी मतपेरिया, पंतप्रधान जॉन की हे आहेत.
- न्यूझीलंड सोबत सामरिक आणि आर्थिक परस्पर सहकार्य प्रशांत (पॅसिफिक) महासागर क्षेत्रात न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी या दोन देशांना भेट देणारे प्रणव मुखर्जी भारताचे पहिले राष्ट्रपती आहे.
- न्यूझीलंड 1947 व पापुआ न्यू गिनी 1975 मध्ये ब्रिटिशापासून मुक्त झाले.
- न्यूझीलंडने भारताच्या ओएनजीसी विदेशी विभागाला उत्तर न्यूझीलंडच्या तराकी खोर्यात 2121 किमी अंतराच्या गॅस ब्लॉकचा नैसर्गिक वायू संशोधनासाठी 12 वर्षाच्या मालकी हक्काचा परवाना मिळाला.
- जागतिक बँकेच्या व्यापार अहवालानुसार वेगाने विकसित होणर्या देशांच्या यादीत न्यूझीलंड दुसर्या क्रमांकावर आहे.
- न्यूझीलंडचे राष्ट्रपती (ग.ज.) हे ब्रिटनच्या राणीचा अधिकृत प्रतिनिधी असतो. त्याची निवड पंतप्रधानाच्या सल्ल्याने होते.
- पापुआ न्यु गिनी हा भारताच्या अतिपूर्वीकडील 80 लाख लोकांचा देश होय. सोने, चांदी, तांबे, तेल, नैसर्गिक वायू खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात, घनदाट वनस्पती, प्रशांत महासागराचा 800 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.