विभक्ती व त्याचे प्रकार

vibhakti v tyache prakar

विभक्ती व त्याचे प्रकार

Must Read (नक्की वाचा):

क्रियापद व त्याचे प्रकार

 

 • नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
 • नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
 • नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.
 • प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता
 • व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म
 • तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण
 • चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान
 • पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान
 • षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध
 • सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण
 • संबोधन – नो – संबोधन

विभक्तीचे अर्थ :

 • 1) कारकार्थ/ कारकसंबंध

वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात. तसेच क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.

विभक्तीचे मुख्य 6 कारकार्थ आहेत

 • कर्ता
 • कर्म
 • करण
 • संप्रदान
 • अपादान (वियोग)
 • अधिकरण

1) कर्ता –

 • क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते.
 • प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.
 • उदा. राम आंबा खातो.

2) कर्म –

 • कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय.
 • हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
 • व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.
 • उदा. राम रावणास मारतो.

3) करण –

 • वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात.
 • करण म्हणजे क्रियेच साधन.
 • उदा. आई चाकूने भाजी कापते.
 • या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकूने या शब्दांची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.

4) संप्रदान –

 • जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
 • दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात.
 • उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.
 • या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.
 • आजीने नातीला गोष्ट सांगितली.
 • गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात.

5) आपदान (वियोग) –

 • क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.
 • दा. मी शाळेतून आताच घरी आलो.
 • या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय.

6) अधिकरण (आश्रय/ स्थान)

 • वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात.
 • उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.
 • या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे

2) उपपदार्थ :

 • नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.
 • उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले.
 • वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.
 • वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.

सामान्य रूप :

विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात.

उदा.

 • घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये ‘घोड्या’ हे सामान्यरूप.
 • पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – या सर्व शब्दांमध्ये ‘पाण्या’ हे सामान्यरूप.

 पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप :

1. ‘अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • खांब-खांबास,
 • काळ-काळास
 • निर्णय-निर्णयास/निर्णयाने
 • दोर-दोरास/दोराने
 • बाक-बाकास/बाकाला.

2. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • घोडा-घोड्यास, घोड्याला
 • दोरा– दोर्‍यास, दोर्‍याने
 • पंखा-पंख्याला, पंख्यास

 अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.

3. ‘ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा. 

 • धोबी-धोब्याला, धोब्यास
 • तेली-तेलीला, तेल्यास
 • माळी-माळीला, माळ्यास

अपवाद :  हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.

4. ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.

उदा. 

 • भाऊ-भावास, भावाचा
 • विंचू-विंचवास, विंचवाला
 • नातू-नातवाला, नातवास.

5. ‘ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.

उदा. 

 • फडके-फडक्यांचा
 • गोखले-गोखल्यांचा
 • फुले-फुल्यांचा

6. ‘ओ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘ओ’ कारान्त राहते.

उदा.  

 • किलो-किलोस, किलोला
 • धनको-धनकोस, धनकोला
 • हीरो-हीरोला, हिरोस.

 स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप :

 1. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ए’ कारान्त होते व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.

उदा.  

 • वीट-विटेस, विटेला, विटांना, विटांचा.
 • जीभ-जीभेस, जिभेला, जिभांचा, जिभांना
 • सून-सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा.

2. काही वेळा ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.

उदा.

 • भिंत-भिंतीस, भिंतीला, भिंतीचा
 • विहीर-विहिरीस, विहिरीला
 • पाल-पालीस, पालीला

3. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.

उदा. 

 • शाळा-शाळेत, शाळेस, शाळेला.
 • भाषा-भाषेत, भाषेस, भाषेचा.
 • विधा-विधेस, विधेला, विधेचे

4. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ‘ई’ कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.

उदा. 

 • भक्ती-भक्तीने
 • नदी-नदीस
 • स्त्रि-स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा
 • बी-बीस, बियांचा
 • दासी-दसींचा, दासीला
 • पेटी-पेटीस, पेटीला.

5. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते ‘वा’ कारान्त होते.

उदा.    

 • -ऊवास, उवाला
 • काकू-काकूस, काकूला.
 • सासू, सासुला, सासवांना.

6. ‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • बायको-बायकांना, बायकांचा.

नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप:

1. ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • मूल-मुलास, मुलाला, मुलांना
 • पान-पानास, पानाला, पानांना

2. ‘ई’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • पाणी-पाण्यात, पाण्याचा
 • मोती– मोत्यात, मोत्याचा
 • लोणी-लोण्यात, मोण्याचा

3. ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.

उदा.

 • लिंबू-लिंबास, लिंबाचे
 • कोकरू-कोकारास, कोकराचे

4. काही वेळा ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.

उदा.

 • कुंकू-कुंकवास, कुंकवाचा
 • गडू-गडवास, गडवाचा

5. ‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.

 • तळे-तळ्यात, तळ्याला
 • केळे-केळ्याची, केळ्याचे
 • खोके-खोक्यात, खोक्याला
 • डोके-डोक्यात, डोक्याला

 विशेषणाचे सामान्यरूप :

1. ‘अ’ कारान्त ‘ई’ कारान्त व ‘ऊ’ कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.

उदा.  

 • जगात गरीब माणसांना कोणी विचारात नाही.
 • त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
 • मला कडू कारल्याची भाजी आवडते.

2. ‘आ’ कारान्त विशेषणांचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.

उदा.    

 • भला माणूस-भल्या माणसास
 • हा मुलगा-ह्या मुलास
 • खरा माणूस– खर्य्या माणसाला.
Must Read (नक्की वाचा):

नाम व त्याचे प्रकार

You might also like
6 Comments
 1. Sanket Metkar says

  Nice information

 2. sujit says

  I want information about विभक्ती आणी पृकार

 3. Vardhman Jayram Kalyankar says

  Hi I feel van rakshak Bharti form please give me advice for getting the job in forest department

 4. satish rawale says

  ‘विभक्ती’ आणि ‘प्रत्यय’ या दोघान्मधला प्रामाणित व्याकरणात काय भेद सांगितलेला आहे?

 5. Yashraj says

  Thanks for this information i am safe now because it was my home work and I don’t no vibhakti

  1. Sadanand Kumbhar says

   महत्त्वाचे या शब्दाची विभक्ती आणि कारकार्थ सांगा

Leave A Reply

Your email address will not be published.