अपूर्ण विधेयदर्शक क्रियापदे
Must Read (नक्की वाचा):
- खालील वाक्ये वाचा –
1. The baby sleeps.
2. The baby seems happy.
- या दोन्ही वाक्यांमधील क्रियापदे अकर्मक आहेत.
- पण जेव्हा आपण ‘The baby sleeps’ असे म्हणतो तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
- उलटपक्षी जर आपण ‘The baby seems’ असे म्हटले तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी अकर्मक क्रियापद seems हा एका शब्दाची (उदा. happy) आवश्यकता असते. अशा प्रकारच्या क्रियापदाला अपूर्ण विधेयदर्शक क्रियापद (Verb of Incomplete Predication) असे म्हणतात.
- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी लागणार्या शब्दाला (येथे haapy) क्रियापदाचे पूरक (Complement of the verb) किंवा विधेयाचे पूरक (Complement of the Predicate) असे म्हणतात.
- अपूर्ण विधेयांची क्रियापदे सर्वसाधारणपणे bring, becoming, seeming, oppearing इत्यादी कल्पना व्यक्त करतात. साधारणपणे, पुरकामध्ये नामाचा (Predicative Noun) (विधिनाम) किंवा विशेषणाचा (विधि विशेषण) (Predicative Adjective) समावेश होतो.
खालील वाक्यात दाखवल्याप्रमाणे जेव्हा पूरक कर्त्याचे वर्णन करते तेव्हा त्याला कर्ता पूरक (Subjective Complement) असे म्हणतात.
1. Tabby is a cat.
2. The earth is round.
3. John becme a soldier.
4. Mr. Mehta became mayor.
5. The man seems tired.
6. You look happy.
7. The sky grew dark.
8. Roses smell sweet.
9. Sugar tastes sweet.
10. She appears pleased.
11. This house is to be let.
- टीप – जेव्हा कर्ता पूरक (Subjective Complement) हे नाम असते (1,3,4 मधल्या प्रमाणे) तेव्हा ते कर्त्याच्याच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असते.
- विधेयच्या पूर्तीसाठी काही सकर्मक क्रियापदांना कर्मा व्यक्तिरिक्त पुरकाचीदेखील आवश्यकता असते.
- जसे –
1. The boys made Rama captain.
2. His parents nemed him Hari.
3. This made him vain.
4. The jury found him guity.
5. Rama called his cousin a liar.
6. Exercise has mede his muscles strong.
7. I consider the man trustworthy.
8. God called the light day.
9. We thought him a rascal.
10. They chose him their leader.
- येथे प्रत्येक बाबतीत, पूरक (complement) कर्माचे (Object) वर्णन करते म्हणून त्याला कर्म पूरक (Objective complement) म्हणतात.
- टीप – जेव्हा कर्म पूरक (Objective complement) (1,2,5,8,9,10 मध्ये असल्याप्रमाणे) हे नाम असते तेव्हा कर्माप्रमाणेच व्दितीया विभक्तीत असते.