क्रियापदाचे मूळ रूप व त्याचे उपयोग

क्रियापदाचे मूळ रूप व त्याचे उपयोग

Must Read (नक्की वाचा):

पुरुषवाचक सर्वनाम

 • खालील वाक्ये वाचा –
 1. I want to go.
 2. They tried to find fault with us.
 • ‘To go’ आणि ‘to find’ ही क्रियापदाची मूळ रुपे आहेत.
 • क्रियापदाचे मूळ रूप हा क्रियापदाचा पाया आहे. बर्‍याच वेळा त्या आधी to वापरतात.
 • खालील वाक्ये वाचा –
 1. To err is human.
 2. Birds love to sing.
 3. To respect our parents is our duty.
 4. He refused to obey the orders.
 5. Many men desire to make money quickly.
 • पहिल्या वाक्यात, क्रियापदाचे मूळ रूप हे एखाधा नामाप्रमाणे is या क्रियापदाचा कर्ता आहे.
 • दुसर्‍या वाक्यात, क्रियापदाचे मूळ रूप हे एखाधा नामाप्रमाणे love या क्रियापदाचे कर्म आहे.
 • तिसर्‍या वाक्यात एखाधा नामाप्रमाणे क्रियापदाचे मूळ रूप is या क्रियापदाचा कर्ता आहे; परंतु एखाधा क्रियापदाप्रमाणे त्याला कर्मदेखील आहे.
 • चौथ्या वाक्यात, क्रियापदाचे मूळ रूप एखाधा नामाप्रमाणे refused या क्रियापदाचे कर्म आहे, परंतु एखाधा क्रियापदाप्रमाणे त्याला कर्मदेखील आहे.
 • पाचव्या वाक्यात, क्रियापदाचे मूळ रूप एखाधा नामाप्रमाणे desire या क्रियापदाचे कर्म आहे. परंतु एखाधा क्रियापदाप्रमाणे त्याला क्रियाविशेषणाने मर्यादित केलेले कर्मदेखील लागते.
 • असे दिसून येईल की, क्रियापदाचे मूळ रूप हे क्रियापदाची काही विशिष्ट लक्षणे असणारे (विशेषत: जेव्हा क्रियापद सकर्मक असेल तेव्हा त्याला कर्म लागणे आणि क्रियाविशेषण जोडणे वगैरे) एक प्रकारचे नाम आहे. थोडक्यात तर क्रियापदाचे मूळ रूप हे क्रियापद नाम आहे.
 • क्रियापदाच्या मूळ रूपाबरोबर बरेचदा ‘to’ हा शब्द वापरतात, परंतु हा त्याचा महत्वाचा घटक किंवा खूण नव्हे.
 • अशाप्रकारे काही क्रियापदानंतर (bid, let *need, *dare, see, hear) आपण क्रियापदाचे मूळ रूप ‘to’ शिवाय वापरतो.
 • जसे –
 1. Bid himgo there.
 2. I bade him go.
 3. Let him sit here.
 4. I will not let you go.
 5. Make him stand.
 6. I made him run.
 7. We need not go to-day.
 8. You need not do it.
 9. You dare not do it.
 10. I saw him do it.
 11. I heard him cry.
 12. I speak.       
 13. We speak.
 14. You speak.   
 15. You speak.
 16. He speaks.   
 17. They speak.
 • याचा एकच अपवाद म्हणजे क्रियापद ‘to be’ for आपण म्हणतो –
 1. I am         we are
 2. You are     you are
 3. He is         they are
 • कर्त्याप्रमाणे क्रियापद चालविण्याच्या पुढील अभ्यासासाठी पाहा. 
 • Will, would, shall, should, may might, can, could आणि must या क्रियापदानंतरसुद्धा क्रियापदाचे मूळ रूप (to शिवाय) वापरतात.  
 1. I will pay the bill.
 2. You should work harder.
 3. He can speak five languages.
 4. You must come to the office at nine tomorrow.  
 • तळटीप – जेव्हा ती ‘do’ बरोबर संयोजलेली असतात तेव्हा सोडून
 • Had better, had rather, would rather, sooner than, rather than या नंतरही क्रियापदाचे मूळ रूप ‘to’ शिवाय उपयोगात येते.
 1. You had better ask permission.
 2. I had rather play than work.
 3. I would rather die than suffer so.

क्रियापदाच्या मूळ रूपाचा वापर (Use Of The Infinitive) :

 • गुणवाचक शब्दाबरोबर किंवा त्या शिवायही, क्रियापदाचे मूळ रूप नामाप्रमाणे वापरता येते.

उदा.

1. क्रियापदाचा कर्ता म्हणून,

उदा.

 1. To find fault is easy.
 2. To err is human.
 3. To reign is worth ambition.

2. सकर्मक क्रियापदाचे कर्म म्हणून,

उदा.

 1. I do not mean to read.
 2. He likes to play cards.

3. क्रियापदाचे पूरक म्हणून,

उदा.

 1. Her greatest pleasure is to sing.
 2. His custom is to ride daily.

4. शब्दयोगी अव्ययाचे (preposition) कर्म म्हणून,

उदा.

 1. He had no choice but (=except) to obey.
 2. The speaker is about to begin.

5. कर्मवाचक पुरुक (Obective Complement) म्हणून.

उदा. I saw him go.

 • अशाप्रकारे जेव्हा क्रियापदाचे मूळ रूप नामाप्रमाणे वापरतात तेव्हा त्याला (Simple infinitive) असे म्हणतात.
 • क्रियापदाचे मूळ रूप खालीलप्रमाणेदेखील वापरता येते.

1. क्रियापदाचा अर्थ, कारण व्यक्त करण्यापुरता,

उदा.

 1. He called to see my brother (=for the purpose of seeing my brother).
 2. We eat to live. (Purpose)
 3. I come to bury Caesar. (Purpose)
 4. He wept to see the desolation caused by the flood. (Cause)

2. विशेषणाचा अर्थ मर्यादित करण्यासाठी,

उदा.

 1. Figs are good to eat.
 2. This medicine is pleasant to take.
 3. The boys are anxious to learn.
 4. He is too ill to do any work.

3. नामाचा अर्थ मर्यादित करण्यासाठी,

उदा.

 1. This is not the time to play.
 2. You will have cause to repent.
 3. He is a man to be admired.
 4. Here is a house to let.
 5. This house is to let.

4. एखादे वाक्य मर्यादित करण्यासाठी,

उदा.

 1. To tell the truth, I quite forgot my promise.
 2. He was petrified, so to speak.
 • जेव्हा क्रियापदाचे मूळ रूप अशाप्रकारे वापरले जाते तेव्हा त्याला क्रियापदाचे कृदंतीय (Gerundial) किंवा विशेषक मूळ रूप असे म्हणतात.
 • असे दिसते की, 1 आणि 2 मध्ये क्रियापदाचे कृदंतीय मूळ रूप हे क्रियाविशेषणाचे कार्य करते. तर 3 मध्ये विशेषणाचे कार्य करते आणि 4 मध्ये स्वयंपूर्ण (absolutely) म्हणून वापरलेले आहे.
 • क्रियापदाचे मूळ रूप हे कर्तरी (active) किंवा कर्मणी (passive) असू शकते. कर्तरीमध्ये त्याचे वर्तमानकालीन रूप (present) किंवा पूर्ण रूप (perfect) असते आणि ते एखाधा क्रियेचा केवळ उल्लेख करते किंवा अपूर्ण अथवा चालू क्रिया (Progressive) दर्शविते.

    कर्तरी (Active)

 1. Present : to love.
 2. Perfect : to have loved.
 3. Present Continuous : to be loving.
 4. Perfect Continuous : to have been loving.
 • जर कर्म वाच्य असेल तर क्रियार्थक नामाचे रूप वर्तमान आणि पूर्ण असते.

    कर्मणी (Passive)

 1. Present : to be loved.
 2. Perfect : to have been loved.
Must Read (नक्की वाचा):

प्रश्नार्थक सर्वनाम

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.