टिळक युगातील महत्वाच्या घटना

टिळक युगातील महत्वाच्या घटना

1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

 • सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.
 • शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.
 • रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.
 • ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.
 • न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.
 • भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.

2. बंगालची फाळणी (1905) :

 • लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
 • बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
 • बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
 • आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
 • टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
 • सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

3. टिळकांना शिक्षा :

 • ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

4. होमरूल लीग चळवळ :

 • डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.
 • थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.
 • सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.
 • लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.
 • बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.

5. टिळकांचे निधन :

 • लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰
 • या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.
 • एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.
 • भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.
You might also like
1 Comment
 1. Manoj pawar says

  Nice mpsc world

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World