टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार 2014, 2015 व 2016 (संपूर्ण माहिती)

टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार 2014, 2015 व 2016 (संपूर्ण माहिती)

  • टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार (The Tagore Award for Cultural Harmony) 2014, 20152016 साठी अनुक्रमे मणीपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह, बांग्लादेशातील छायानट सांस्कृतिक केंद्रज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाची घोषणा केंद्र सरकारने 25 ऑक्टोबर 2018 रोजी केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि न्या. एन. गोपालस्वामी तसेच भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निवड समितीने ही नावे जाहीर केली.

tagor sanskrutik souhard puraskar

राजकुमार सिंहजीत सिंहविषयी माहिती –

  • जन्म: 1 मे 1931.
  • मणीपुरी नर्तक.
  • Thanga-ta, NatelSankirtana, Lai-Haraoha आणि Rasleela या मणीपुरी नृत्यप्रकारात पारंगत.
  • नवी दिल्ली येथे ‘Manipuri Nrityashram‘ नावच्या मणीपुरी नृत्यशाळेची स्थापना.
  • पुरस्कार: संगीत नाट्य अकादमी पुरस्कार (1984), पद्मश्री (1986), साहित्य कला परिषद पुरस्कार (1975).

छायानट –

  • बांग्लादेशातील सांस्कृतिक केंद्र.
  • स्थापना: 1961.
  • रविंद्रनाथ टागोरांच्या कार्याचे (सांस्कृतिक, साहित्यिक व संगीत) जगभरात प्रसार करण्याचे काम.
  • बांग्लादेश स्वातंत्र्यचळवळीत मोलाचे कार्य.

राम सुतार यांच्याविषयी माहिती –

  • ज्येष्ठ शिल्पकार.
  • जन्म: 19 फेब्रुवारी 1925, धुळे (महाराष्ट्र).
  • J.J. School of Arts, मुंबईमध्ये शिक्षण.
  • सन 1954 मध्ये औरंगाबाद येथे भारतीय पुरातत्व खात्यात नौकरी.
  • सन 2015 मध्ये अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांची स्थिती सुधारण्यासाठी काम.
  • सन 1961 मध्ये गांधीसागर धरणाजवळ (मध्यप्रदेश) 45 फुट उंचीची ‘चंबळ देवी‘च्या स्मारकाची निर्मिती.
  • नोएडा येथील वर्कशॉपमध्ये सुरुवातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या 3 फूट, 18 फूट व 30 फूट उंचीच्या प्रतिकृती तयार केल्या. त्यानुसारच गुजरात येथे वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीच्या पुतळ्याची निर्मिती.
  • पुरस्कार: पद्मश्री (1999), पद्मभूषण (2016).
  • महात्मा गांधी, महाराणा रणजीत सिंह, वल्लभभाई पटेल, भीमराव आंबेडकर, राष्ट्रपती शंकर द्याल शर्मा यांच्यासह इतर अशा 15 पेक्षा जास्त मूर्तींची निर्मिती.
पुरस्कारविषयी माहिती –
1. पहिला पुरस्कार: रवी शंकर (2012).

2. दूसरा पुरस्कार: झुबिन मेहता (2013).
3. स्वरूप: 1 कोटी रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि पदक.
4. रविंद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मदिनानिमित्त पुरस्काराची सुरुवात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.