स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना

Swatantrottar Bharatatil Mahtwachya Ghatana

स्वातंत्रोत्तर भारतातील महत्वाच्या घटना 

 • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.
 • स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
 • भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
 • भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
 • 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
 • 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
 • 17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
 • भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
 • डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
 • घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
 • 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
 • घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.
 • इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
 • ‘दार समितीने’ भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
 • तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.
 • आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले.
 • राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.सदस्य- के. एम. पंनीकरहृदयनाथ कुंझरू हे होते.
 • केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.
 • 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
 • 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.
 • 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.
 • 1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.
 • 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.
 • 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.
 • 1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.
You might also like
5 Comments
 1. Shanaishawar chavhan says

  Nice app

 2. Shanaishwar chavhan says

  Ha app aplya screen vr ghenya sathi Kay karav lagel sir

 3. Shanaishwar chavhan says

  Ha app aplya screen vr ghenya sathi Kay karav lagel sir

 4. Shanaishwar chavhan says

  Ha app aplya screen vr ghenya sathi Kay karav lagel sir

 5. Faisal says

  Hyderabad sansthan 1948 madhe bolun zale…..

Leave A Reply

Your email address will not be published.