सुवर्ण मुद्रिकरण योजना (Suvarn Mudrikaran Yojana)

सुवर्ण मुद्रिकरण योजना (Suvarn Mudrikaran Yojana)

योजनेची सुरवात5 नोव्हेंबर 2015 रोजी या योजनेची सुरुवात झाली.

योजनेचे उद्देश –

1.भारतीय कुटुंबाकडे पडून असणारे साधारणत: 20 हजार टन सोने काढून बँकिंग प्रणालीत आणणे.

*या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती कमीत कमी 1.94 ग्रॅम सोने जमा करू शकते.

*या योजनेअंतर्गत सोने अल्प कालावधी (1 ते 3 वर्षे), मध्यम कालावधी (5 ते 7 वर्षे) आणि दीर्घ कालावधीसाठी 2015-16 या वर्षासाठी अनुक्रमे 2.25% आणि 2.5% व्याजदर निश्चित करण्यात आला होता.

*अल्प कालावधीसाठी सोने जमा करणारे जमा सोन्याबरोबर सोने किंवा सोन्याच्या किमतीच्या बरोबर धनराशी व्याजासहित प्राप्त करू शकतात.

*मध्यम आणि दीर्घकाळासाठी सोने जमा करणार्‍यांना त्यावेळीच्या किमतीनुसार सोन्याची किमत आणि व्याज मिळेल.

*या योजनेसाठी कोणतीही व्यक्ती स्वर्ण बचत खाते उघडू शकते.

*या योजनेतील सोने बँका किंवा रिफायनरीजवळ जमा राहील.

*सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत 2 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकूण 1030.2 किलोग्रॅम सोने जमा करण्यात आले होते.

*सुवर्ण मौद्रीकरण योजनेअंतर्गत बँकेत ठेवण्यात येणार्‍या सोन्यावर बँकांव्दारे FD प्रमाणे व्याज प्राप्त होईल. अशा व्याजावर कोणत्याही प्रकाराचा कर व भांडवली कर आकाराला जात नाही.

*सुवर्ण मौद्रीकरण योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त इच्छेप्रमाणे सोने जमा करू शकते.

सुवर्ण मौद्रीकरण योजनेच्या अटी –

या योजअंतर्गत व्यक्ती कमीत कमी 1 वर्षासाठी सोने जमा करू शकते. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी सोने जमा करता येणार नाही.

जमा करण्यात येणारे सोने सिक्के, बिस्कीट, दागिने अशा कोणत्याही स्वरुपात स्विकारण्यात येईल.

अशा योजनेचा फायदा फक्त भारतीय नागरिकच घेऊ शकतात.

व्याजासंबंधी अटी –

*व्याजाची निश्चिती सोन्याच्या स्वरुपात केली जाईल.

उदा – एखाद्या व्यक्तीने 100 ग्रॅम सोने जमा केले तर बँक त्यास 5% व्याज देते किंवा कालावधी पूर्ण होताच ग्राहकाच्या खात्यात 105 ग्रॅम सोने असेल. ग्राहक असे 105 ग्रॅम सोने घेऊ शकतो; परंतु तेच सोने मिळणार नाही जे ग्राहकामार्फत जमा करण्यात आले होते.

सोने जमा केल्यानंतर व्याज त्या दिवसापासून सुरू होईल ज्या दिवशी सोन्याची शुद्धता तपासणी पूर्ण होईल. यासाठी 30 दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला आहे.

सोने (Gold) संबंधी अटी-

सोने हे विशेषत: 20, 22 आणि 24 कॅरेटचे असते. अशा वेळी त्याची देशामधील मुद्रा ब्युरोमार्फत मान्यताप्राप्त 350 होलमार्क केंद्राव्दारे सोन्याची शुद्धता व किंमत करण्यात येईल. अशा केंद्रांच्या सर्टिफिकेटच्या आधारे हे सोने बँकेत जामा केले जाईल.

ग्राहकाव्दारे जमा करण्यात येणार्‍या सोन्याचे परीक्षण करण्यात येईल. प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सोने जमा करणारा ग्राहक अशा योजनेचा लाभ घेऊ शकते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.