SRPF Police Bharti Question Set 1

SRPF Police Bharti Question Set 1

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

  1.  शुक्रवार
  2.  मंगळवार
  3.  गुरुवार
  4.  बुधवार

उत्तर : बुधवार


 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

  1.  मावस बहीण
  2.  पुतणी
  3.  भाची
  4.  आत्या

उत्तर :भाची


 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

  1.  K
  2.  J
  3.  N
  4.  S

उत्तर :K


 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

  1.  गुरुवार
  2.  बुधवार
  3.  सोमवार
  4.  रविवार

उत्तर :गुरुवार


 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

  1.  9 वेळा
  2.  10 वेळा
  3.  11 वेळा
  4.  8 वेळा

उत्तर :10 वेळा


 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

  1.  पाच
  2.  सात
  3.  आठ
  4.  वरील सर्व

उत्तर :पाच


 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

  1.  लाकूड
  2.  हात
  3.  बैठक
  4.  पॉलिश

उत्तर :बैठक


 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

  1.  आंबा
  2.  गुळ
  3.  बटाटा
  4.  गवत

उत्तर :आंबा


 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

  1.  E
  2.  W
  3.  S
  4.  R

उत्तर :S


 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

  1.  312
  2.  121
  3.  393
  4.  101

उत्तर :393


 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

  1.  51
  2.  52
  3.  50
  4.  48

उत्तर :51


 12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

  1.  10
  2.  15
  3.  25
  4.  30

उत्तर :15


 13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

  1.  PICEP
  2.  CEPRJ
  3.  PIRCE
  4.  PRICE

उत्तर :PRICE


 14. विसंगत शब्द शोधा.

  1.  जव (सातू)
  2.  कापूस
  3.  तांदूळ
  4.  गहू

उत्तर :कापूस


 15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

  1.  2 तास
  2.  अडीच तास
  3.  1 तास
  4.  दिड तास

उत्तर :दिड तास


 16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

  1.  31520201514
  2.  31515202014
  3.  32520152014
  4.  31420151520

उत्तर :31520201514


 17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

  1.  तीन वेळा
  2.  दोन वेळा
  3.  चार वेळा
  4.  पाच वेळा

उत्तर : दोन वेळा


 18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

  1.  1
  2.  25
  3.  5
  4.  15

उत्तर :5


 19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

  1.  12
  2.  15
  3.  18
  4.  20

उत्तर :12


 20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

  1.  9 वाजून 25 मिनिटे
  2.  10 वाजून 35 मिनिटे
  3.  11 वाजून 20 मिनिटे
  4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

You might also like
1 Comment
  1. pratik uikey says

    good

Leave A Reply

Your email address will not be published.