शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 9 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 9 बद्दल माहिती

  • कलेची आवड असणारा – कलासक्त, कलाप्रेमी
  • कमळासारखे डोळे आहेत अशी – कमलनयना, कमलाक्षी
  • इच्छेलेले पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  • आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराडमुख
  • ऐकताना कानाला गोड वाटणारा – कर्णमधुर
  • केलेले उपकार जानणारा – कृतज्ञ
  • केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
  • कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
  • अंधार्‍या रात्रीचा पंधरवडा – कृष्णपक्ष, वद्यपक्ष
  • अंगात एखादी कला असणारा – कलावंत, कलाकार
  • कष्टाने मिळणारी गोष्ट – कष्टसाध्य
  • भाकरी करण्याचे लाकडी पसरट पात्र – काटवट, काथवट
  • हाताची सांकेतिक किंवा खाणाखुणांची भाषा – करपल्लवी
  • कार्य करण्यास सक्षम असलेला – कार्यक्षम
  • कामामध्ये टाळटाळ करणारा – कामचुकार
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.