संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)

  • संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क क्षेत्रातील पुरस्कार ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाले. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 73व्या अधिवेशनाचे अध्यक्ष मारिया फर्नांडा इस्पिनोझा ग्रेस यांनी हे पुसरकर जाहीर केले.

sanyukt rashtrache manavi hakk puraskar 2018

2018 चे पुरस्कारार्थी-

आसमाँ जहांगीर (पाकिस्तान)
  • जन्म: जानेवारी 1952, मृत्यू: फ्रेब्रुवारी 2018.
  • (पेशाने वकील) पाकिस्तानमध्ये महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांविषयी भेदभाव याविरोधात कार्य.
  • पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
  • हा पुरस्कार मिळणार्‍या चौथ्या पाकिस्तानी महिला.
  • पाकिस्तानी लश्कर, गुप्तहेर संस्था व हिंसक संघटनांवर त्यांनी कठोर टीका केली.
  • त्या पाकिस्तान मानव हक्क आयोगाच्या सहसंस्थापक व अध्यक्षा होत्या.
  • पाकिस्तानमध्ये वेठबिगारीविरोधात कायदा पारित होण्यासाठी त्यांनी साहाय्य केले.
  • 2005 साली रेमन मॅगसेसे पुरस्कार.
रिबेका ग्युमी (टांझानिया)
  • पेशाने वकील, म्सिचना (Misichana) इनिशीएटिव्ह या एनजीओच्या संस्थापक.
  • ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करते.
  • टांझानिया मॅरेज अॅक्ट 1971 विरोधातील खटला 2016 मध्ये ग्युमी यांनी जिंकला. या कायद्याने 14 वर्षांच्या मुलींचे लग्न वैध ठरवले होते.
जोएनिया वापिचाना (ब्राझील)
  • उत्तर ब्राझील येथील वकील.
  • काँग्रेसमध्ये निवडून येणार्‍या उत्तर ब्राझील प्रांतातील पहिल्या महिला.
  • सर्वोच्च फेडरल न्यायालयासमोर वकीली करणार्‍या पहिल्या उत्तर ब्राझीलच्या महिला वकील.
फ्रंटलाईल डिफेंडर्स
  • आयर्लंड येथील मानवी हक्क कार्यकर्त्यांना संरक्षण देणारी संस्था.
  • स्थापना 2001 साली डब्लिन (आयर्लंड) येथे.
  • मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या जीवितावरील हल्ले, आरोग्य यासंबंधी सुरक्षा देणे, तसेच त्याकरता अनुदान व प्रशिक्षण देण्याचे कार्य.
UN मानवी हक्क पुरस्कार –
1. स्थापना: 1966 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून.
2. हेतू: मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आणि संयुक्त राहस्त्राच्या इतर मानवी हक्कांच्या यंत्राणांमधील मानवी हक्कांचे संरक्षण व प्रसार यासाठी उच्चतम योगदान देणार्‍या व्यक्ति व संघटनांचा सन्मान करणे.
3. सुरुवात: 1968 साली पहिल्यांदा हे पुरस्कार दिले गेले. त्यानंतर दर 5 वर्षानी हे पुरस्कार दिले जातात.
4. भारतीय पुरस्कारार्थी: बाबा आमटे हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय आहेत. त्यांना 1988 मध्ये हा पुरस्कार मिळाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.