सामान्य विज्ञान (इयत्ता 7 वी) संपूर्ण माहिती

इयत्ता 7 वी संपूर्ण माहिती

महत्वाचे मुद्दे :

 • अनविकरणीय – हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते).
 • हवा प्रदूषणाचे हवेतील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तपमानवाढीचे उदभवले आहे.
 • इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.
 • समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीयम क्लोराईड हे क्षार असतात.
 • तारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच ‘नालाबंर्डिंग’ असे म्हणतात.
 • 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.
 • वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जणूके दुसर्याह वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.
 • डोडो व भारतीय चित्ता यांची जणूके आपण कायमची हरवून बसलो आहोत.
 • संयुक्त राष्ट्रसंघाने दरडोई 50 ली. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.
 • पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.
 • 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 • जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटील अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.
 • वनस्पतीच्या पानातील हरितद्रव हे प्रकाश उर्जेचे रूपांतर रसायनिक उर्जेत करते.
 • अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे.
 • वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते.
 • भट्टीचे तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणार्‍या तापमापीला ‘पायरोमीटर’ म्हणतात.
 • आयोडीन व नॅप्थालिन हे संप्लवनशील पदार्थ आहेत.
 • अमीबा,पॅरमॅशिअम, क्लोरेल्ला हे एकपेशीय सजीव आहेत.
 • सजीवांची रचना आणि कार्य पेशीच्या पातळीवर होत आहेत.
 • समान कार्य करणार्‍या पेशीच्या समूहाला ‘उती’ असे म्हणतात.
 • उती पातळीवर संघटन असणारे सजीव – मॉस, शैवाल, जलव्याल.
 • ठराविक काम एकत्रितपणे करण्यासाठी इंद्रिय समूहाला ‘इंद्रिय संस्था’ म्हणतात.
 • प्राण्यांच्या किंवा वनस्पतींचा समूह ज्या विशिष्ट जागेत राहून विकसित होतो त्या जागेस ‘अधिवास’ म्हणतात.
 • एकपेशीय जीवामध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. उदा. जिवाणू, क्लोरेल्ला.
 • कालिका पासून होणार्याा प्रजननास कलिकयन म्हणतात. उदा. किन्व (यीस्ट)
 • पुमंग हा नर घटक तर जयांग हा स्त्री घटक असतो.
 • पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास ते रुजतात. याला ‘परागण’ असे म्हणतात.
 • अंड्यात वाढणार्याज जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणारे जरायूज.
 • सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे चार कप्पे असतात.
 • हृदयाकडून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेणार्यान रक्तवाहिन्यांना ‘धमण्या’ म्हणतात.
 • शरीराच्या भागाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यांना ‘शिरा’ म्हणतात.
 • धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना ‘केशिका’ म्हणतात.
 • अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.
 • अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.
 • अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.
 • मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला ‘अणू’ म्हणतात.
 • पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.
 • रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.
 • 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला ‘श्राव्य ध्वनी’ म्हणतात.
 • अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.
 • 20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.
 • अँबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ म्हणतात.
 • काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.
 • एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.
 • आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.
 • छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.
 • स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.
 • शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.
 • प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.
 • प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.
 • आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.
 • ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातआंधळेपणा होतो.
 • ‘ब’ जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी
 • ‘क’ जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कव्ह्री
 • ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावी मुडदुस पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.
 • कॅल्शिअमच्या अभावी हाडे ठिसूळ बनतात. दातांची झीज होते.
 • फॉस्फरसच्या त्रुटिमुळे वजनात घट होते व वाढ खुंटते.
 • लोहाच्या अभावामुळे पंडूरोग, रक्तक्षय (अॅनेमिया) हा विकार होतो.
 • आयोडीनच्या अभावामुळे गलगंड (गॉयटर) हा रोग होतो.
 • आपल्या मानेत असणार्यां अवटू ग्रंथीमधून थायरोस्झिन संप्रेरक स्त्रवते.
 • प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणार्याप रासायनिक पदार्थांना ‘संप्रेरके’ म्हणतात.
 • जणूके पेशीच्या केंद्रकामध्ये समवलेली असतात. उंची वाढण्यास करणीभूत असलेले वृद्धी संप्रेरके मेंदू मधील पियुषिकेत तयार होते.
 • किटकभक्षी वनस्पती – दवबिंदू (ड्रोसेरा), घटपर्णी या आहेत.
 • जहाजावर किती माल भरावा याचा निर्देश करण्यासाठी जहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हणतात.
 • लोलकातून गेल्यावर सूर्यचा प्रकाश सात रंगात विभागतो. त्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.
 • रंगाचा क्रम – तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा
 • उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते – वहन, अभिसरण, प्रारण.
 • थर्मासफ्लास्क मध्ये गरम किंवा थंड वस्तू तापमानामध्ये फरक न होता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम किंवा थंडच राहते.
 • गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना ‘थर्मोवेयर’ म्हणतात.
 • उष्णतेचे सुवाहक – तांबे, लोह, अल्युमिनिअम, इ.उष्णतेचे दुर्वाहक – माती, लाकूड, काच, इ.
 • रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान तर रक्त घेण्याची प्रक्रिया ‘रक्त पराधन’ होय.
 • रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते.
 • प्रजनन मुख्यत्वे पुढील दोन प्रकारे होते –

 अलैंगिक प्रजनन :

वनस्पती –

 1. शाकीय प्रजनन – मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
 2. विभाजन – एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
 3. कलिकायन –    किन्व यीस्ट
 4. बिजाणूजन्य – बुरेशी
 5. खंडिभवन – शैवाल, स्पायरोगायरा

 लैंगिक प्रजनन:

वनस्पती –

 • सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

प्राणी –

 • नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.
 • वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला ‘डायलेसिस (व्याष्लेषण)’ म्हणतात.
 • बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.
 • आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.
 • कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.
 • परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.
 • जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.
 • विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.
 • हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.
 • आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

 पिष्टमय पदार्थ :

 • पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.
 • तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.
 • पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.
 • जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.
 • पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते.

प्रथिने –

 • तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात.
 • विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.

स्निग्ध पदार्थ –  

 • तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.
 • स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.
 • पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.

 चेतासंस्था :

 • मानवाच्या चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने मेंदू, चेतरज्जू, चेतातंतू असतात.
 • चेतासंस्थेचे मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था असे दोन गट पडतात.
 • मेंदू आणि चेतारज्जुंचा मध्यवर्ती चेतासंस्थेत समावेश होतो.
 • चेतातंतूचा समावेश परिघीय चेतासंस्थेत होतो.
 • चेतातंतू निरनिराळ्या अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेची संपर्क घडवून आणतात.
 • शरीरातील विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम अपवाही चेतातंतू करतात.
 • चेतासंस्था व चेतारज्जुंकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहचविण्याचे काम अभिवाही चेतातंतू करतात.
 • काही क्रिया घडताना संदेश मेंदुपर्यंत न पोहचता फक्त चेतातंतूपर्यंत पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
 • अंत:स्त्रावी ग्रंथी वाहिनीहीन असतात. उदा. पियुषिका, अवटू, अधिवृक्क,पाईनी,हृदोधिष्ठ.

 आम्ल आणि आम्लारी :

 • सामन्यात: धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात.
 • पाण्यात विरघळणार्‍या आम्लारिंना ‘अल्कली’ म्हणतात.
 • सर्व अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात.
 • उदासीनिकरणात क्षार आणि पाणी तयार होतात.
 • जेव्हा दाहक आम्ल आणि दाहक आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा मिळणारे क्षार उदासिन असतात. उदा. मीठ, सोडीयम नायट्रेट.
 • दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लधर्मी असतात.
 • अॅल्युमिनिअम क्लोराईड, अमोनिअम सल्फेट क्षार आम्लधर्मी असतात.
 • दाहक आम्लारी आणि सौम्य आम्ल यातून मिळणारे क्षार हे आम्लारिधर्मी असतात.
 • धुण्याचा सोडा (सोडीयम कार्बोनेट), बेकिंग सोडा (सोडीयम बायकार्बोनेट) हे क्षार आम्लारिधर्मी आहेत.
 • प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
 • लोणची, मुरांबा टिकविण्यासाठी अॅसेटीक आम्ल किंवा बेंझोईक आम्ल वापरतात.
 • आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते.
 • गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. त्यावर उपाय म्हणून मॅग्नेशियम हायड्रोक्साइड सारखी आम्लारिधर्मी औषधे दिली जातात.
 • कला रंग जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौरचुलीतील भाड्यांना बाहेरून काळा रंग असतो.
 • तापमापीमध्ये पार्‍याऐवजी अल्कोहोल वापरता येईल.
 • पाण्याची विशिष्ट उष्मा सर्वाधिक असल्यामुळे शीतक म्हणून मोटारीमध्ये आणि यंत्रामध्ये त्याचा उपयोग होतो.
 • लघवीमधील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते.
 • आरसा पुसल्याने त्यावर विधूतभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते.
 • शीतपेयातील सोडा आम्लारी वर्गात मोडतो.पचन संस्था –

   

 • द्रवनांक आणि उत्कलनांक :
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.