सागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)

सागरमाला प्रोजेक्ट (Sagar Mala Project)

*सागरमाला प्रोजेक्टची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 14 एप्रिल 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या मेरीटाईम इंडिया कार्यक्रमावेळी करण्यात आली.

*सागरमाला प्रोजेक्ट अंतर्गत निळ्या क्रांतीतील महत्वपूर्ण बदलाबरोबर बंदर आधारित विकासवाढीस चालना देण्यात येणार आहे.

सागरमाला प्रोजेक्ट उद्देश

1. योजनेचा प्रमुख उद्देश बंदरांच्या जवळ प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष विकासास प्रोत्साहन देणे.

2. बंदरापर्यंत मालाची गती, सुरक्षा व कमी खर्चात ने-आण करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.

3. या अंतर्गत प्रतिकृतीबरोबर विकासाच्या नवीन क्षेत्रात विकास करणे व महत्वपूर्ण प्रतिकृतीस प्रोत्साहन देणे.

4. मुख्य बाजरापर्यंत संपर्क वाढविणे, त्याचबरोबर रेल्वे, क्षेत्रीय व रस्ते सेवांमध्ये सुधारणा करणे.

5. भारताच्या GDP मध्ये वाणिज्यिक वस्तूंचे व्यापार प्रमाण 42% आहे, ते वाढवून 70-75% करणे.

सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत क्षेत्र

बंदरांचे आधुनिकीकरण

1. 5-6 नवीन बंदरांची निर्मिती करणे.

2. बंदरांची क्षमता वाढविणे

3. बंदरांची खोली वाढविणे

बंदरांच्यामध्ये संपर्क

1. किनारपट्टी क्षेत्र वाहतूक मजबूत बनविणे.

2. भारतीय रेल्वे मंत्रालयाने 20,000 कोटी रुपयांची पोर्ट रेल्वेसंपर्क (SPV) बनवून मालभाडे खर्च कमी करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

बंदर आधारित विकास

1. किनारपट्टी रेषेबरोबर औद्योगिक आणि निर्यात विकासास गती देणे.

2. किनारपट्टी रेषेजवळील किनारपट्टी आर्थिक क्षेत्रा (CEZs) बरोबर बंदर विकास साध्य करणे.

किनारपट्टी सामुदायिक विकास

1. मासेमारी करणारे व इतर किनारपट्टी समुदायास रोजगार उपलब्ध करणे.

2. भारतीय किनारपट्टीजवळील व्दिपांचा (बेटांचा) विकास करणे.

इतर क्षेत्र

1. किनारपट्टी पर्यटन व मनोरंजनासंबंधी कार्यक्रमास प्रोत्साहन देणे.

2. छोटी समुद्री जहाज, किनारपट्टी जहाज वाहतूक व आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक वाढीस लावणे.

3. जहाज निर्माण, जहाज दुरूस्ती व जहाज पूर्ण बांधणीस प्रोत्साहन देणे.

4. लॉजिस्टिक पार्क, गोडावून, समुद्री सेवा निर्माण करणे.

*सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत Ministry of Shipping व्दारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल.

*सागरमाला प्रोजेक्टअंतर्गत 6 मोठ्या बंदरांचा विकास करण्यात येईल.

1. Kerala Vizhinjam International Seaport

2. Tamilnadu Colachel Seaport

3. Maharashtra Vadhavan Port

4. Karnataka Tadadi Port

5. Andhra Pradesh Machhlipatnam Port

6. West Bengal Sagar Island Port

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World