राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 6
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 6
- 28 मार्च 2016 ला हरियाणा सरकारने जात आरक्षण विधेयकाला मंजूरी दिली.
- 29 मार्च 2016 रोजी हरियाणा विधानसभेत जाट समाजासह इतर पाच समाजासाठी आरक्षण
- विधेयक मंजूर झाले. सरकारी आणि सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये आणि वर्ग तीन
- आणि वर्ग चार सरकारी नोकर्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- हरियाणा मागासवर्ग (सेवेत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश) विधेयक 2016 आणि
- हरियाणा (मागासवर्ग आयोग विधेयक 2016) अशी दोन विधेयक मंजूर करण्यात आली होती.
- 29 मार्च 2016 रोजी ई-कॉमर्स रिटेलिंगच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक (ऑटोमॅटिक सुरू, 100
- टक्क्यापर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारची मान्यता)
- भारताच्या स्वच्छता मोहिमेसाठी जागतिक बँकेने 1.5 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले.
- गोदावरी आणि कृष्णा यांचा जलसंगम घडवून नद्या जोडणारे देशातील पहिले राज्य आंध्रप्रदेश
- आहे.
- 1 एप्रिल 2016 पासून संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी.
- देशातील सर्वाधिक आयकर बुडवणार्या ‘टॉप 20’ च्या यादीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. या
- राज्यात 24 करबुडवे आहेत. या सर्वांनी 576.8 कोटी रूपयांचा कर बुडविलेला आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय (1 एप्रिल 2016) पुरुषाप्रमाणेच महिलांना मंदिरात प्रवेश
- मिळणार. राज्यघटनेतील अनुच्छेद 14 (समानता), अनुच्छेद 15 (भेदभावास प्रतिबंध), अनुच्छेद 25
- (धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य) व महराष्ट्र हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप अॅक्ट कलम 3 या
- बाबींचा विचार करून निर्णय देण्यात आला.
- ब्रिटनच्या आशियाई वंशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत हिंदुजा बंधु (जी.पी. हिंदुजा, एम.पी.
- हिंदुजा) चौथ्यांदा अव्वल स्थानी राहिले. या यादीत ब्रिटनमधील 101 आशियाई व्यक्तींच्या
- संपत्तीचा आढावा घेण्यात आला. (एशियन मीडिया अँड मार्केट) ही प्रकाशन संस्था ही यादी तयार
- करते.
- जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वेमार्गावरील चिनाब नदीवर जगातील सर्वात
- उंच रेल्वे पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल 359 मीटर उंचीचा आहे. हा रेल्वे पूल बक्कल (कत्रा)
- आणि कौरी (श्रीनगर) या दोन नदीकाठांना जोडणारा आहे. हा पुल 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे.
- जगात सध्या फ्रान्समधील टॉम नदीवर असलेला पुल सर्वात उंचीवर आहे. (340 मीटर)
- भारतातील सर्वात वेगवान धावणारी रेल्वे ताशी 150 ते 16 कि.मी. वेग, दिल्ली ते आग्रा दरम्यान
- 5 एप्रिल 2016 रोजी प्रथम धावली या रेल्वेने 188 कि.मी. अंतर 100 मिनिटात पूर्ण केले.
- संपूर्ण दारूबंदी असलेले बिहार हे गुजरात, नागालँड, मिझोराम नंतर देशातील चौथे राज्य होय.