राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4
- तात्या टोपे 200 व्या जयंती निमित्त केंद्र सरकारने 200 रुपयांचे नाणे व 10 रुपयांचे नाणे जारी केले आहे. 2015-16 राज्य सरकारने तात्या टोपे यांचे 200 वे वर्ष साजरे करत आहे.
- 19 एप्रिल 2016 भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली.
- ऑक्टो. 2015 ते 15 एप्रिल 2016 पर्यंत देशात साखरेचे उत्पादन 2.43 कोटी टन झाले आहे. हे एका वर्षाच्या अगोदरच्या कालावधीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कमी झाले आहे. या काळात साखरेची निर्यात 13.5 लाख टन झाली होती, महाराष्ट्रात ऑक्टो. 2015 ते एप्रिल 2016 पर्यंत साखरेचे उत्पादन 83.6 लाख टन झाले. मागील वर्षी उत्पादन 99.6 लाख टन झाले होते.
- ब्राझील नंतर भारत हा साखरेचा दुसरा उत्पादक देश होय.
- 1992 मध्ये हेरगिरीवरून पकडण्यात आलेला भारतीय कृपालसिंग पाकिस्तान तुरुंगात मृत्यु पावला.
- ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहिम देशातील 100 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
- बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यान प्रथम धावणार, लांबी 508 कि.मी. ठाण्याची खाडी ते विरार दरम्यान ही बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार (21 कि.मी.) या प्रकल्पावर 97636 कोटी रुपये खर्च होणार, यात 81 टक्के गुंतवणूक जपान सरकार करणार, रेल्वे इंजिन, डब्बे, सिग्नल, ऊर्जा प्रणाली सहित जपानमधून आयात होणार, हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी निती आयोगाचे उपाध्यक्ष. यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली, या प्रकल्पासाठी ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही विशेष कंपनी स्थापन करण्यात आली. जपानकडून या कर्जाची मुदत 50 वर्ष असून 7.01 टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे.
- आंध्रप्रदेशातील तिरूपती जिल्ह्यात भारतीय विज्ञान संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ स्थापन करण्यात येणार आहे.
- छिथीराई महोत्सव तमिळनाडू
- केंद्र सरकारने देशातील 10 राज्य व 256 जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे.
- द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) चे महासंचालक आर.के. पचौरी यांची हकालपट्टी करण्यात आली. 20 एप्रिल 2016, लैंगिक छळ प्रकरणी.
- कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने युनो आमसभेत 175 देशांनी पारित हवामान बदल स्वाक्षरी केली. 22 एप्रिल 2016, भारताच्या वतीने पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
- प्रत्येक घराला वीज पुरवठा करण्याच्या योजने अंतर्गत भारताने नवीनीकरण ऊर्जेची क्षमता 2022 पर्यंत 175 गिगावॅट्स वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.