राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2

राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2

 •  भारत-फ्रान्स करार (30 एप्रिल 2016) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील सहा अणुभट्ट्यांच्या अंमलबाजवणीसाठी भारतीय अणुऊर्जा महामंडळाने फ्रान्सशी करार केला. 2032 पर्यंत 63 हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे.
 • विजय माल्या याने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा 2 मे 2016 रोजी राजीनामा दिला.
   
 • केंद्र सरकारने देशात साखरेच्या साठयावर 500 टनांची मर्यादा घातली आहे. देशात सर्वाधिक साखर कारखाने तामिळनाडू राज्यात आहेत. (35) महाराष्ट्र (13) राज्यात 30 एप्रिल 2016 पर्यंत 83.75 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
 • केंद्र सरकारने मनरेगाची मंजुरी 162 वरुन 167 रुपयांवर केली.
 • रोजगार निर्मितीत कर्नाटक प्रथम, महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर
 • देशातील जलसंकट, दुष्काळ आणि पाणी टंचाई यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नदी पुनर्जीवन कायदा करावा यासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी 5 मे 2016 रोजी दिल्ली जल सत्याग्रह केला.
 • पोलीसांच्या आत्महत्येत तमिळनाडू प्रथम, महाराष्ट्र व्दितीय, कर्नाटक तृतीय क्रमांकावर.
 • भौगोलिक माहिती नियामक विधेयक 2016 नुसार भारताचा चुकीचा नकाशा वापरण्यात 100 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा 7 वर्ष तुरुंगवास होणार.
 • पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बंगालमध्ये कुचबिहार जिल्ह्याच्या सीमेवरच्या लोकांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच मतदान केले.
 • भारत आणि बांग्लादेश यांच्या भूखंड करार झाला. (2016) त्यात परस्पराच्या हद्दीत असलेले भूभाग परत करण्यात आले. बांग्लादेशातील 9776 नागरिक त्या अंतर्गत भारतात आले त्यांच यावेळी प्रथमच मतदान होते. 103 वर्षीय असगर अली या व्यक्तीने प्रथमच निवडणुकीत मतदान केले.
 • माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा 3 मे 2016 ला 100 जयंती दिन साजरा करण्यात आला.
     
 • देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य आंध्रप्रदेश.
 • रवींद्रनाथ टागोर यांची 7 मे 2016 रोजी 155 वी जयंती साजरी करण्यात आली.
 • केरळचे राज्यपाल व माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम केरळमध्ये मतदान करणारे भारतातील राज्यपाल होय.
 • देशातील पहिली आणि ऐकमेव आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सोने वा चांदीची रिफायनरी एमएमटीसी पीएएमपीने 6 मे 2016 रोजी दतोला नावाने वैदिक सुवर्णनाणे सादर केले. दतोला 999.9 शुद्ध सोन्यातील एक अष्टकोणी नाणे आहे त्याचे वजन 11.6638 ग्रॅम आहे.
 • मे महिन्यात उत्तराखंड व जम्मु काश्मीर जंगलामध्ये आग लागली होती.
 • गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणामध्ये मेडीगड्डा धरण उभारण्यात येणार आहे. असा करार महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात झाला आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.