राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 1

राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 1

 • सध्या भारतीय 24 उच्च न्यायालयात 601 न्यायाधीश आहेत. सर्वाधिक अलाहाबाद उच्च न्यायालयात 86 न्यायाधीश आहेत. व सर्वात कमी जम्मु-काश्मीर उच्च न्यायालयात 8 न्यायाधीश आहेत. सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 10 न्यायाधीश असे प्रमाण आहे.
 • उत्तराखंडमधील 2013 च्या ढगपुटी, अतिवृष्टी, पुराच्या प्रलयानंतर प्रथमच केदारनाथ गंगोत्री, यमनोत्री मंदिर (9 मे 2016), बद्रिनाथ मंदिर (11 मे 2016) खुले करण्यात आले.
 • चीनमधील दुधाला भारतात बंदी घालण्यात आली आहे.
 • देशातील ‘पाणबदाड, क्षारयुक्त व खारपाणपट्टा म्हणून ओसाड पडलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी सुपीक बनविण्यासाठी शेतकर्‍यांना केंद्र सरकार 60% अनुदान देणार आहे. (राज्य सरकार 36% व केंद्र सरकार 24% वाटा)
 • भारतातील 600 जिल्हयासाठी केंद्र सरकारने आकस्मिक योजना लागू केली.
 • दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक कुटुंबाला दररोज 100 ऐवजी 150 रुपये रोजगाराची हमी
 • धिंगा गवर महोत्सव – राजस्थान
 • गाईच्या दुधाची पहिली बँक दिल्ली येथे नियोजित.
 • विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर, गुजरातमध्ये 12.36 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. (2015 मध्ये) 2014 मध्ये 2.01 अब्ज डॉलर गुंतवणूक झाली होती.
 • हरियाणा जनहित काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षात विलिन झाला. (28 एप्रिल 2016) 2007 मध्ये हा पक्ष हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी स्थापन केला होता.
 • गुजरातमध्ये आर्थिक आरक्षण : सामान्य वर्गातील (अनारक्षित जाती) आर्थिकदृष्टया मागासवर्गीयांसाठी 10 टक्के आरक्षणासाठी गुजरात राज्य सरकारने घोषणा केली. (29 एप्रिल 2016) 6 लाख अथवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब या आरक्षणासाठी पात्र असणार आहे. यापूर्वी या राज्यात मागासवर्गीय अनुसूचीत जाती आणि जनजातींना 50% आरक्षण देण्यात आले आहे.
 • शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेवजी यांची 463 वी जयंती साजरी करण्यात आली. (29 एप्रिल 2016)
 • आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी 139 क्रमांक.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.