राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 भाग 2 बद्दल माहिती
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 भाग 2 बद्दल माहिती
- राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 3.1 टक्क्यांनी वाढ.
- या आर्थिक पाहणी अहवालानुसार 2011 च्या आकडेवारी आधारित हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध जैन यांची धर्मनिहाय लोकसंख्या, साक्षरता, लिंग गुणोत्तर आकडेवारी पुढील प्रामाणे देण्यात आलेली आहे.
- हिंदु – राज्यात हिंदूचे साक्षरतेचे प्रमाण 81.8 टक्के आहे. या मध्ये ग्रामीण भागात 76.7 तर शहरी भागात 89.3 असे प्रमाण आहे.
- मुस्लिम – राज्यातील मुस्लिमांचे लोकसंख्येच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण 83.6 टक्के आहे. ग्रामीण भागात 79.1 टक्के तर शहरी भागात 85.2 टक्के प्रमाण आहे. (भारतात मुस्लिमांच्या) साक्षरतेचा दर 68.5 टक्के आहे.
- ख्रिश्चन – ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या राज्यात एका टक्का असून साक्षरतेचा दर 92.30 टक्के आहे. ख्रिश्चन समाजाचे लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त म्हणजे 1031 आहे.
- शीख – शीख समाजाची संख्या राज्यात 0.2 टक्के असून साक्षरतेचा दर 90.9 टक्के आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात कमी म्हणजे 891 आहे.
- बौद्ध – राज्यात बौद्ध धर्मीयांची संख्या 5.8 टक्के असून साक्षरतेचे प्रमाण 83.2 टक्के आहे.
- जैन – जैन समुदाय राज्यात 1.2 टक्के असून, साक्षरतेचे प्रामाण सर्वाधिक 95.3 टक्के आहे.
- हिंदु धर्मीयांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण ग्रामीण भाग – 951, शहरी भाग – 894
- मुस्लिमांमध्ये लिंग गुणोत्तर ग्रामीण भाग – 959, शहरी भाग – 893
- जैन धर्मीयांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण – ग्रामीण भाग – 922, शहरी भाग – 974 इतके आहे.
- बौद्ध धर्मीयांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण, ग्रामीण भाग – 963, शहरी भाग – 978 इतके आहे.
- राज्यातील साक्षरता : प्रमाण 82.30 टक्के
साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेले जिल्हे :
- मुंबई (89.20 %), मुंबई उपनगर (89%), नागपूर (88.4%), आकोला (88%), अमरावती (87.4%) पुणे (86.20%)
- सर्वात कमी साक्षरता जिल्हा : नंदुरबार (64.40%)
- महाराष्ट्रात दर एक हजार पुरूषमागे 929 स्त्रिया आहेत.
- महाराष्ट्राची लोकसंख्या (2011 जनगणना) 11 कोटी 23 लाख 74 हजार (पुरुष-पाच कोटी 82 लाख 43 हजार, स्त्रिया-पाच कोटी 41 लाख 31 हजार)
- रत्नागिरी जिल्ह्यात दर 1000 पुरुषामागे 1122 स्त्रिया, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर हजार पुरुषामागे 1036 स्त्रिया आहेत. तर, मुंबई शहरात दर हजार पुरुषामागे 832 मुंबई उपनगर 860, ठाणे 886 स्त्रिया आहेत.