राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 भाग 1 बद्दल माहिती

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2015-16 भाग 1 बद्दल माहिती

 • राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 17 मार्च 2016 रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
 • राज्याचा विकास दर आठ टक्के.
 • उद्योग क्षेत्राच्या वाढीचा वेग गेल्या वर्षी 6.8 टक्के होता. यावर्षी हा दर 5.9 टक्क्यावर आला आहे.
 • निर्मिती क्षेत्रात 4.6 टक्क्यावरून 6.2 टक्के वाढ.
 • सेवा क्षेत्रात दहा टक्क्यावरून 10.8 टक्के एवढी वाढ झाली आहे.
 • राज्याच्या कर्जावरील बोजा 10 टक्क्यांनी वाढला हे प्रमाण राज्याच्या एकूण सकल उत्पन्नाच्या 16.92 टक्के आहे.
 • सलग दोन वर्ष कमी पावसामुळे राज्यातील कृषी उत्पन्नावर विपरित परिणाम झाला असून या उत्पन्नात यंदा 2.7 टक्के घट होण्याची शक्यता.
 • रब्बी हंगामातील पिकांखालील क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्के होईल.
 • अन्नधान्यात 27 टक्के व तेलबियाच्या उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
 • तृणधान्य व कडधान्याच्या उत्पादनात अनुक्रमे 18.7 टक्के व 47 टक्के घट झाली.
 • 43 टक्के सहकारी दूध संस्था आणि 51 टक्के दुध संघ तोट्यात
 • एकूण 24 टक्के सहकारी संस्था तोट्यात असून त्यातील 22 टक्के संस्था कृषी पतपुरवठा करणार्‍या आहेत.
 • कापूस व तेलबिया आणि फळभाज्यांचे उत्पादन अनुक्रमे 59.5 टक्के, 52.8 टक्के आणि 15 टक्के इतके घटले.
 • 3 लाख 33 हजार 160 कोटी रुपये राज्यावर कर्ज आहे. हे कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचे प्रमाण 16.92 टक्के इतके आहे. राज्य स्थूल राज्य उत्पन्नात 5.8 टक्के वाढ होऊन ते 15 लाख 24 हजार 846 कोटी रुपयांवर गेले आहे.
 • महसुली तुट 3757 कोटी, वित्तीय तुट 30733 कोटी रुपये आहे.
 • दरडोई उत्पन्नात 7 टक्केवाढ
 • एप्रिल 2015 मधील ग्रामीण भागातील चनलवाढ 4.8 टक्क्याहुन घटून डिसें. 2015 मध्ये 2.6 टक्क्यांवर तर नागरी भागात 4.7 टक्क्यावरुन 3.5 टक्के झाला.
 • 2013-14 वर्षात स्थुल उत्पन्न 14 लाख 41 हजार 843 कोटी होते. हे उत्पन्न 2014-15 या वर्षात 15 लाख 24 हजार 846 कोटी झाले. 2015-16. या वर्षात 16 लाख 75 हजार कोटींवर पोहोचणे अपेक्षित. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.