रेल्वेच्या इतिहासाविषयी माहिती
रेल्वेच्या इतिहासाविषयी माहिती
Must Read (नक्की वाचा):
- पहिले सीझन तिकीट मुंबईत 1854 मध्ये देण्यात आले.
- पहिली दोन मजली गाडी 1862 साली निम्न वर्गाच्या डब्यासाठी चालविल्या गेली.
- पहिली ऐष आराम दालनयुक्त डबा 1863 मध्ये मुंबईच्या गव्हर्नरसाठी तयार करण्यात आला.
- ‘व्हॅक्युम ब्रेक’ हा पहिला महत्वाचा विकास होता. या आविष्कारचे कार्य 1879 मध्ये सुरू झाले.
- 1881 मध्ये पहिली छोटीशी गाडी दार्जिलिंगला धावू लागली. 1999 मध्ये या गाडीला हेरीटेज म्हणून जाहीर करण्यात आले.
- टॉयलेटची सुविधा पहिल्या वर्गासाठी 1891 मध्ये तर निम्न वर्गासाठी 1907 मध्ये प्रथम करण्यात आली.
- डब्यामध्ये विजेचे दिवे प्रथम बसवण्याचा मान 1902 मध्ये जोधपूर रेल्वेने पटकावला, नंतर 1903 मध्ये विजेवर चालणारे पंखे फिरू लागले.
- रेल्वेमध्ये पहिले भोजनालय 1904 मध्ये आले.
- 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली इ.एम.यु. (उपनगरीय गाडी) हार्बर मार्गावरून व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला धावली.
- पहिल्या स्वयंचलित सिग्नलचे काम 1928 मध्ये सुरू झाले.
- फ्रन्टियर मेलची सुरुवात सप्टेंबर 1928 मध्ये झाली त्यावेळी ती सर्वात वेगवान गाडी होती.
- 1936 मध्ये जीआयपी रेल्वेवर पहिला वातानुकूलित डबा जोडण्यात आला.
- हिले डिझल इंजिन 1945 मध्ये धावले.
- 17 मे 1972 रोजी मुंबई-दिल्ली यांना जोडण्यार्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसचे उद्घाटन झाले. 19 तास 5 मिनिटांच्या अवधीत या गाडीने 1388 कि.मी. अंतर पार केले.
- 1977 मध्ये नवी दिल्ली येथे पहिल्या आणि एकमेव राष्ट्रीय रेल्वे म्युझियमचे उद्घाटन झाले.
- पहिली कॉम्प्युटरकृत आरक्षण व्यवस्था 1986 मध्ये नवी दिल्ली येथे सुरू झाली.
- जगातील पहिली लाइफलाईन एक्सप्रेस (धावते रुग्णालय) 1991 साली व्हिटी येथून धावली.
- उपनगरी रेल्वेत 4 मे 1992 रोजी महिलांसाठी पहिली खास गाडी पश्चिम रेल्वेने सुरू केली.
- 1997 मध्ये क्रेडिट कार्डवर तिकीट देणारे पहिले स्थानक दिल्ली होय.
- फेअरी क्वीन (पर्यांची राणी) हे 145 वर्ष जुने इंजिन जगातले सर्वात जुने कार्यरत इंजिन असल्याचे प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिले.
- पहिली जनशताब्दी एक्सप्रेस (मुंबई-मडगाव) 16 एप्रिल 2002 मध्ये धावली.