पुलित्झर पुरस्कार 2016
पुलित्झर पुरस्कार 2016
- यंदा या पुरस्काराचे 100 वे वर्ष.
- ‘द असोसिएटेड (एपी) व ‘रायटर्स’ वृत्तसंस्था, तसेच ‘न्युयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्रास पुरस्कार देण्यात आला आहे.
- ‘द असोसिएहेड प्रेस (एपी) कशामुळे मिळाला?
आग्नेय आशियाई देशांतून अमेरिकी बाजारात येणार्या मासे आणि अन्य सागरी अन्नाच्या व्यापारानं मोठया प्रमाणात कामगारांना वेठीला धरले जाते. त्या गैरप्रकारावर एपीने 10 लेखांच्या मालिकेतून प्रकाश टाकला होता.
- रायटर्सला कशामुळे?
युरोपीय देशातील निर्वासितांचे प्रश्न छायाचित्राच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्याबद्दल रायटर्स आणि न्युयॉर्क टाइम्सला पुरस्कार मिळाला.
- न्युयॉर्क टाइम्सला त्यांच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेबद्दल आतापर्यंत 119 पुलित्झर पुरस्कार मिळाले.
- कॅलिफोर्नियातील सॅम बर्नार्डिनो येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाच्या वृत्तांकनासाठी ‘लॉस एंजलस टाइम्स’ ला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
- ‘द बोस्टन ग्लोव, टेम्पा बे, द न्युयॉर्कर’ या नियतकालिकांनाही पुरस्कार मिळाला.
- संगीत क्षेत्रासाठी हा पुरस्कार हेंरी थ्रिडगिला देण्यात आला.
- उत्कृष्ट नाटकासाठी – हॅमिल्टन (नाटक) लीन- मॅन्युअल मिरांडा यांना देण्यात आला.
- उत्कृष्ट साहित्यासाठी – बर्बियन डेज : अ सर्फिंग लाईफ आत्मचरित्रासाठी विल्यम फी यांना देण्यात आला.