पोलिओ लस योजनेबद्दल संपूर्ण माहिती

पोलिओ लस योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • 25 एप्रिल 2016 पासून जगात टीओपीव्ही ऐवजी बिओपीव्ही लस, देण्यास सुरुवात झाली. याला भारताने नॅशनल स्विच डे म्हटले.
  • टीओपीव्ही म्हणजे ट्रायव्हॅलट ओरल पोलिओ व्हॅक्सिन यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूचा (ब्रुनहिल्ड, लॉन्सिंग, लिऑन) समावेश आहे.
  • आता टाईप 2 विषाणूंचे जगातून 1999 मध्ये कायमचे उच्चाटन झालयं यासाठीच बीओपीव्ही मध्ये टाईप 2 (लॉन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला बायव्हंटलट पोलिओ व्हॅक्सिन म्हणतात.
  • तसेच टीओपीव्ही 9 मे 2016 पासून पूर्णबंद झाली आहे.
  • भारत सरकारने इम्युनाइज इंडिया मोहीम सुर केली असून या मोहिमेव्दारे मातांच्या मोबाईलवर आठवणीसाठी तीन वेळा लसीकरणाच्या तारखा पाठविल्या जाणार आहे.
  • सध्या जगातील 80 टक्के नागरिक पोलिओ-विरहित देशांमध्ये राहतात. यास अपवाद पाकिस्तान व अफगणिस्तान (अधिक पोलिओग्रस्त रुग्ण आहेत.)
  • 13 जाने. 2011 नंतर भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही.
  • 27 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले.
  • 1951 मध्ये जोनास सॉलक यांनी पोलिओचे विषाणू शोधून लस तयार केली.
  • ब्रुनहिलडे विषाणूंमुळे अर्धांगवायू होतो, लॉन्सिंग आणि लिऑन विषाणूमुळे अपंगत्व येते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.