Police Bharti Question Set 29

Police Bharti Question Set 29

1. ‘विराजमान झालेला’ या शाब्दसमुहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता?

  1.  अतिथी
  2.  अग्रज
  3.  अधिष्ठित
  4.  विद्यमान

उत्तर : विद्यमान


 2. ‘कोल्हेकुई’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

  1.  निष्फळ बडबड
  2.  निरर्थक गोष्ट
  3.  क्षुद्र लोकांची ओरड
  4.  अर्थहीन पाठांतर

उत्तर :क्षुद्र लोकांची ओरड


 3. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची —– हे वाक्य पूर्ण करण्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल?

  1.  पित्तखवळणे
  2.  कंबर खचणे
  3.  कंबर बांधणे
  4.  धकडी भरणे

उत्तर :कंबर खचणे


 4. ‘सप्तपदी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?

  1.  व्दंव्द
  2.  उपपदतत्पुरुष
  3.  बहूव्रीही
  4.  व्दिगू

उत्तर :व्दिगू


 5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

  1.  अत्तर
  2.  पेशवा
  3.  तंबाखू
  4.  दादर

उत्तर :तंबाखू


 6. ‘आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?

  1.  माया
  2.  तुझी
  3.  आम्हावारी
  4.  आभाळागत

उत्तर :आभाळागत


 7. ‘तो काम न करता नुसता फिरत असतो’. या वाक्याचा काळ ओळखा?

  1.  रिती वर्तमानकाळ
  2.  साधावर्तमानकाळ
  3.  अपूर्ण वर्तमानकाळ
  4.  रिती भूतकाळ

उत्तर :रिती वर्तमानकाळ


 8. ‘जाऊ’ या शब्दाचे अनेकवचनी रुपे कोणते?

  1.  जाऊ
  2.  जाववा
  3.  ज्यावा
  4.  जावा

उत्तर :जावा


 9. ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

  1.  दृष्टीत दोष असणे
  2.  दृष्टीशिवाय दिसत नाही
  3.  आंधळ्याला सृष्टी दिसत नाही
  4.  आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.

उत्तर :आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.


 10. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

  1.  लाला लजपतराय
  2.  सुभाषचंद्र बोस
  3.  बाळ गंगाधर टिळक
  4.  रामनाथ गोयंका

उत्तर :बाळ गंगाधर टिळक


 11. महात्मा गांधीजीचा जन्म कोठे झाला?

  1.  पोरबंदर
  2.  राजकोट
  3.  साबरमती
  4.  सेवाग्राम

उत्तर :पोरबंदर


 12. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?

  1.  शिर्डी
  2.  त्र्यंबकेश्वर
  3.  नांदेड
  4.  पैठण

उत्तर :त्र्यंबकेश्वर


 13. इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहे?

  1.  दिल्ली
  2.  मुंबई
  3.  आग्रा
  4.  चेन्नई

उत्तर :दिल्ली


 14. गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधलेला आहे?

  1.  इटीयाडोह
  2.  नवेगाव
  3.  कुर्‍हाडा
  4.  सिवनी

उत्तर :इटीयाडोह


 15. गोंदिया जिल्हयातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

  1.  तिरोडा
  2.  मोरगाव अर्जुनी
  3.  सालेकसा
  4.  देवरी

उत्तर :मोरगाव अर्जुनी


 16. तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?

  1.  उत्तरप्रदेश
  2.  आंध्रप्रदेश
  3.  महाराष्ट्र
  4.  केरळ

उत्तर :आंध्रप्रदेश


 17. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ते निवडा.

  1.  लोकसभा
  2.  राज्यसभा
  3.  विधानसभा
  4.  विधान परिषद

उत्तर :राज्यसभा


 18. गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे केव्हा सुरू झाली?

  1.  25 सप्टेंबर 1996
  2.  26 सप्टेंबर 1996
  3.  25 ऑक्टोबर 1996
  4.  25 सप्टेंबर 1995

उत्तर :25 सप्टेंबर 1996


 19. आयएसआय ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे?

  1.  बांग्लादेश
  2.  इराण
  3.  अफगाणिस्तान
  4.  पाकिस्तान

उत्तर :पाकिस्तान


 20. सागरतळावर होणार्‍या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात त्यास काय म्हणतात?

  1.  भूकंप
  2.  त्सुनामी
  3.  जलतरंग
  4.  लाटा

उत्तर :त्सुनामी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.