Police Bharti Question Set 20

Police Bharti Question Set 20

1. अजय एक काम दहा दिवसात करतो. अतुल तेच काम आठ दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील?

  1.  4 1/2 दिवस
  2.  9 दिवस
  3.  7 1/3 दिवस
  4.  4 4/9 दिवस

उत्तर : 4 4/9 दिवस


2. एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

  1.  6 दिवस
  2.  5 दिवस
  3.  4 दिवस
  4.  7 दिवस

उत्तर :6 दिवस


 3. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही?

  1.  21
  2.  32
  3.  19
  4.  10

उत्तर :10


 4. WTO चे पूर्ण नाव काय आहे?

  1.  वर्ल्ड टुरिझम ऑरगनायजेशन
  2.  वर्ल्ड टेरेरिस्ट ऑरगनायजेशन
  3.  वर्ल्ड ट्रेड ऑरगनायजेशन
  4.  वर्ल्ड ट्राफिक ऑरगनायजेशन

उत्तर :वर्ल्ड ट्रेड ऑरगनायजेशन


 5. कथ्थकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?

  1.  कर्नाटक
  2.  महाराष्ट्र
  3.  गुजरात
  4.  केरळ

उत्तर :केरळ


 6. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अकोला जिल्ह्यात पोलीस स्टेशन नाही?

  1.  दहीहांडा
  2.  माना
  3.  उरळ
  4.  आलेगांव

उत्तर :आलेगांव


 7. खालीलपैकी विसंगती ओळखा.

  1.  RNJ
  2.  XTP
  3.  MIE
  4.  ZWR

उत्तर :ZWR


 8. खालीलपैकी कोणते एक शहर गटात बसत नाही?

  1.  मास्को
  2.  पॅरिस
  3.  न्यूयॉर्क
  4.  इस्लामाबाद

उत्तर :न्यूयॉर्क


 9. ‘सत+जन= सज्जन’ यातील संधी प्रकार ओळखा?

  1.  स्वरसंधी
  2.  व्यंजन संधी
  3.  विसर्ग संधी
  4.  यापैकी नाही

उत्तर :व्यंजन संधी


 10. खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांचे नाही?

  1.  मृत्युंजय
  2.  छावा
  3.  पानीपत
  4.  युगांधार

उत्तर :पानीपत


 11.LIC चा दहा रुपये दर्शनी किंमतीचा शेअर 50 रुपयाला विकत घेतला. त्यावर LIC ने 20 टक्के लाभांश जाहीर केला तर उत्पन्नाचा दर किती?

  1.  2%
  2.  3%
  3.  4%
  4.  5%

उत्तर :4%


 12. आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवडयात शनिवारी कोणती तारीख येईल?

  1.  15 फेब्रुवारी
  2.  22 फेब्रुवारी
  3.  10 फेब्रुवारी
  4.  8 फेब्रुवारी

उत्तर :22 फेब्रुवारी


 13. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मि. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो?

  1.  145 अंश
  2.  150 अंश
  3.  155 अंश
  4.  160 अंश

उत्तर :155 अंश


 14. 4, 20, 120, 840, ——?

  1.  6720
  2.  980
  3.  1040
  4.  5780

उत्तर :6720


 15. A, CD, GHI,?, UVWXYZ गाळलेल्या अक्षर संच भरा?

  1.  MNOP
  2.  NMOP
  3.  KLMN
  4.  MOPK

उत्तर :MNOP


 16. खालीलपैकी विसंगत महिना ओळखा?

  1.  जुलै
  2.  ऑगस्ट
  3.  सप्टेंबर
  4.  ऑक्टोबर

उत्तर :सप्टेंबर


 17. सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब —— mmHg असतो?

  1.  130/90
  2.  100/80
  3.  120/80
  4.  100/80

उत्तर :120/80


 18. —– रक्तपेशी शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा करण्यास मदत करतात?

  1.  तांबड्या
  2.  पांढर्‍या
  3.  प्लेटलेट
  4.  हिरव्या

उत्तर :तांबड्या


 19. —— या रोगात पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते?

  1.  एड्स
  2.  कर्करोग
  3.  क्षयरोग
  4.  मधुमेह

उत्तर :कर्करोग


 20. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?

  1.  व्दिगू
  2.  व्दंव्द
  3.  बहुब्रीही
  4.  विग्रह

उत्तर : विग्रह

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.