पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत चाचणी यशस्वी बद्दल माहिती

पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत चाचणी यशस्वी बद्दल माहिती

 

  • अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रदारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ ची चाचणी यशस्वी झाली. (23 फेब्रु. 2016)
  • रशियाच्या सहकार्याने सागरात पाणबुडीची चाचणी घेण्यात आली होती.
  • विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ ची बांधणी केली गेली.
  • सध्या भारतीय नौदलात ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे. ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली होती. म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी होय.
  • रशियाची ‘आरएफएस एप्रोन’ या ‘हायव्हिंग सपोर्ट शिव’ च्या सहाय्याने ‘अरिहंत’ ची चाचणी घेण्यात आली.

 

पाणबुडीची वैशिष्ट्ये –

  • वजन – 6000 टन.
  • पाण्यात असतांना एखादा विमानालाही लक्ष्य करू शकते.
  • पाण्याच्या आतून पाणी पृष्ठभागावरून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता.
  • बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने सज्ज.
  • ‘अरिहंत’ वर के-15 ही लघु पल्ल्याची क्षेपाणास्त्रे (700 कि.मी. मारा करण्याची क्षमता) आणि के-4 ही 3500 कि.मी. अंतरापर्यंत मारा करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहे.
  • भारताची क्षमता वाढणार.
  • ‘आयएनएस अरिहंत’ मुळे जमीन, हवा, पाण्यातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता भारताकडे असणार.
  • अण्ववस्त्रांनी युक्त पाणबुडीच्या प्रकल्पाला 1970 च्या दशकात मान्यता देण्यात आली.
  • प्रत्यक्ष कामाला 1998 पासून सुरुवात झाली आणि 2009 मध्ये ‘आयएनएस अरिहंत’ चे अनावरण करण्यात आले. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.