Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार (संपूर्ण माहिती)

नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार (संपूर्ण माहिती)

  • 2018 च्या सेऊल शांतता पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. दक्षिण कोरियाच्या सेऊल पीस प्राईस फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

narendra modi seul shantataa puraskar

प्रमुख मुद्दे –

  • हा पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे 14वे व्यक्ती आहेत.
  • आंतरराष्ट्रीय सहकार्य सुधारणे, जागतिक आर्थिक वृद्धीसाठी केलेले प्रयत्न, भारतासारख्या वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढवून मानव विकास साधण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचाराविरोधी तसेच सामाजिक एकात्मता वाढवण्यासाठी चालवलेल्या मोहिमांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या नरेंद्र मोदी यांचा प्रयत्नाची दखल घेत समितीने त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली.
  • भारत व जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मोदी यांनी दिलेले योगदान, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे जी ‘मोदीनॉमिक्स‘ म्हणून ओळखली जातात, या कार्याची दाखल समितीने घेतली.
  • जागतिक पातळीवर यशस्वी परदेश धोरण आखून प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी पंतप्रधान करत असलेले प्रयत्न जे ‘मोदीडॉक्ट्रिन‘ आणि ‘अॅक्ट इस्ट पॉलिसी‘ या नावाने ओळखली जातात, त्याबद्दल समितीने मोदी यांना श्रेय दिले.
पुरस्काराविषयी माहिती –
1. सुरुवात: 1990, कोरियाची राजधानी सेऊल येथे 24व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याच्या निमित्ताने.
2. स्वरूप: 2 लाख डॉलर्स रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक.
3. जागतिक आणि प्रादेशिक शांततेसाठी कोरियन जनतेची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी तसेच मानव जातीत सौहार्द प्रस्थापित करणे, जागतिक पातळीवर विविध देशांदरम्यान नव्याने चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आणि एकूणच जागतिक शांततेला बळकटी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा व्दैवार्षिक पुरस्कार मान्यवर व्यक्तींना प्रदान केला जातो.
4. कोफी अन्नान, अंजेला मर्केल यांसारख्या व्यक्ती व डॉक्टर्स विदाऊट बोर्डर्ससारख्या संघटनेला या पुरस्काराने याआधी सन्मानित करण्यात आले आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World