Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका

मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका

 • प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.
 • व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.
 • भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.
 • केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्‍या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.

मवाळवादी युग :-

 • काॅंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.

मवाळवाद्यांची कार्यपध्दत –

(1) इंग्रजांशिवाय भारताचा विकास आणि देशात शांतता सुव्यावस्था प्रस्थापित होणार नाही म्हणून मवाळवादी नेते इंग्रजांशी एकनिष्ठ होते.

(2) इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्र्वास असून ते न्यायानुसारच योग्य कार्य सुधारणा करतील. त्यांच्याकडील अर्ज, विनंत्या क्रमाक्रमाणे सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल

(3) इंग्रजांनी आपणाला क्रमाक्रमाने सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल.

राष्ट्रीय कॉग्रसचे प्रारंभीचे कार्य –

 • 1885-1905 या काळात मवाळद्यांनी अनेक कार्ये करून आपली उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

(1) देशातील अनेक धर्म, प्रांत, जाती, यांच्या संदर्भात पूर्वग्रह व गैरसमज होते. ते नष्ट करून सर्वाच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्याचे उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

वसाहतीच्या स्वराज्याची मागणी –

 • र्लॉड कर्झनच्या अत्याचारी धोरणामुळे आणि आयरिश नेता मि. स्मेडले यांच्या वसाहतीच्या स्वराज्य या कल्पनेनुसार 1905 च्या बनारस अधिवेशात गोखल्यांनी वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव मांडला व तशी मागणी केली

जाचक कायदे रद्दची मागणी –

 • भारतीयांवर अनेक जाचक कायदे लादले. प्रशासन व न्यायदानात भेदभाव विना चौकशी तुरुंगात ऑम्र्स अ‍ॅक्ट 1878 प्रेस अ‍ॅक्ट इ. जाचक कायदे रद्द करण्याची मागणी अमरावती अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली केली.

लोकजागृतीचे कार्य –

 • कॉग्रसने अर्ज, विनंत्या करुन जनतेची दु:खे सरकार दरबारांमध्ये मांडली. सभा ठराव लेखन या माध्यमांमधून लोकजागृतीचे कार्य केले.

सरकार विरुध्द आक्रमक पवित्रा –

 • काँग्रेस व सरकार यांचे प्रारंभीचे मैत्रीसंबंध कोलकत्या अधिवेशनानंतर राहिले नाहित कारण काँग्रेसने आक्रमक कार्यक्रमांची सुरुवात केली. इंग्रजांविरुध्द अ‍ॅटी कॉर्नली लीनच्या चळवळीप्रमाणे चळवळ सूरु करावी असे आदेश दिले.

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –

 • इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

हिंदी जनतेची गार्‍हाणी मांडली –

 • भारतीयांच्या विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार करण्यासाठी रॉयल कमिशन नेमले.
 • या प्रसंगी कॉग्रेसने सरकारकडे विविध मागण्या केल्या वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य, पोलिस खात्यात व प्रशासनात सुधारणा शासकीय खर्च कपात, शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज, देशी उद्योगंधद्यांना संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज देशी उद्योगधंद्यांना संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ, स्पर्धा परिक्षा भारतात घ्यावी व वयोमर्यादा कमी करावी.

काॅंगे्रसचे इंग्लंडमधील कार्य –

 • इंग्लंडमधील जनतेचा व संसदेचा आपल्या हक्कांना पाठिंबा मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये चळवळ सुरु केली 1887 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.
 • 1889 मध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ दी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन केली.

बंगालची फाळणी :-

 • लॉर्झ कर्झन हा साम्राज्यावादी व स्वसमूह श्रेष्ठत्व सिध्दान्तांचा कट्टर पुरस्कर्ता होता.
 • 1903 सर अ‍ॅन्डयू फ्रेझरने कर्झनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली.
 • ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 1905 मध्ये लंडनच्या स्टॅंर्डट वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केली.
 • बिहार व ओरिसा विस्ताराने मोठा प्रदेश असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी फाळणी करण्यात आली.
 • परंतु प्रत्यक्षात तेथील राष्ट्रवादी चळवळ नष्ट करणे आणि हिंदु मुसलमान यांच्यात भेदनीतीचे राजकारण करणे हाच उद्देश बंगालच्या फाळणीचा असावा.
 • पूर्व बंगाल व आसाम प्रदेश एकत्र आणि पश्चिम बंगालचा प्रदेश असे विभाजन केले.
 • फाळणी विरोधी बंगालमध्ये वंगभंग आंदोलन सुरु झाले. कोलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड सभा घेऊन निषेध केला.
 • सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दि बंगाली वृत्तपत्रातून आंदोलनाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहिर करुन याच दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम केला.
 • गुरुदेव टागोर यांनी हमारा सोनार बं्गला हे काव्य रचले वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले बंगाली ऐक्याचे प्रतीक म्हणून आनंद मोहन बोस यांनी फेडरेशन हॉल चे भूमिपूजन केले.
 • फाळणी रद्द होत नाही तोपर्यत लढा चालू ठेवण्या बाबत निर्णय घेतला.

राष्ट्रीय काॅंग्रसचे कार्य :-

 • 1905-1916 बंगालच्या फाळणीमुळे वंगभंग आंदोलन सुरू झाले.
 • त्या वेळी मवाळ जहाल एकत्र आले 1905 च्या बनारस अधिवेशनाच्या अध्यक्ष पदावरून गोखले यांनी र्लॉड कर्झनवर टीका करून चतु:सूत्री कार्यक्रम स्वीकारून आंदोलनाला पाठिंबा दिला.
 • 1906 च्या कोलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजीने चतु:सुत्रीचा ठराव मंजूर केला आणि कॉग्रसमध्यील संघर्ष टाळला 1907 च्या सुरत अधिवेशनात कॉग्रसमध्ये फूट पडून जहाल-मवाळ गट झाले.
 • या फुटीचा इंग्रजांनी फायदा घेऊन जहालवादी चळवळ मोडण्यासाठी अनेक नेत्यांना शिक्षा ठोठावली 1914 ला टिळकांची सुटका झाली.
 • 1916 च्या लखनौ अधिवेशनात दोन्ही गट एकत्र येऊन अखंड कॉग्रेस पुन्हा निर्माण झाली. तसेच मुस्लीम लीग व कॉग्रेस यांच्यात करार झाला त्यास लखनौ करार म्हणतात.

1909 चा मोर्ले -मिंटो सुधारणा कायदा :-

 • भारतात शांतता निर्माण करण्यासाठी सरकारने 1909 चा कायदा मंजूर केला त्याची कारणे पुढीलप्रमाणे:

(1) 1892 च्या कायाद्याने असमाधान –

 • या कायद्याने केंदि्रय व प्रांतीय कायदेमंडळात सरकारी सभासदांचे निर्णायक बहुमत होते. बिनसरकारी सभासंदांना चर्चेचा अधिकार होता. निर्णयाचा नव्हता तो मिळावा यासाठी मागणी कॉग्रेसने केली होती.

(2) कॉग्रेसचे कार्य –

 • दादाभाई नौरोजी 1893 मध्ये ब्रिटिश संसदेत निवडून गेल्यानंतर त्यांनी भारतीयांना राजकीय हक्क, सरकारी नोकर्‍या मिळाव्यात परीक्षेतील अन्याय दूर करावा. कॅनडाच्या धर्तीवर वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली.

(3) र्लॉड कर्झनची जुलमी राजवट –

 • विद्यापिठ कायदा, कॉर्पेरेशन अ‍ॅक्ट, बंगालची फाळणी इ. जूलमी धोरणाविरोधी लोकांनी आंदोलन केले.

(4) इंग्लंडमधील उदारमतवादी सरकार –

 • 1906 मध्ये इंग्लंडमध्ये उदारमतवादी गटाने सरकारी सुत्रें हाती घेतली त्यांनी भारतातील दहशवाद नष्ट करण्यासाठी व मवाळवाद्यांची सहानुभुती मिळविण्यासाठी कायदा पास केला.

(5) जहालवादाचा प्रभाव कमी करणे –

 • क्रांतीकारकांनी ,खून दरोडयासारख्या दहशतवादी मार्गाचा स्वीकार केला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासठी कायदा मंजूर केला.

(6) मुस्लिमांचे राजकारण –

 • फोडा आणि झोडा नीतीचा उपयोग करुन त्यांच्यात शत्रूत्व ठेवले. 1906 साली आगाखानच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळांनी र्लॉड मिंटोची भेट घेऊन अनेक सवलतींची मागणी केली. त्यांना खुश करण्यासाठी कायदा मुजूर केला.

1909 च्या कायद्यातील तरतुदी :-

(1)भारत मंत्र्याच्या कौन्सिलमध्ये व ग. ज. च्या कौन्सिल मंडळात हिंदी सभासदांची नियुक्ती केली.

(2) केंदि्रय विधीमंडळाची सभासद संख्या 16 वरून 68 एवढी करण्यात आली. त्यामध्ये सरकारी 36बिनसरकारी 32 सभासद होते.

(3) प्रांतीय विधिमंडळाचा विस्तार केला.

(4) जातीय तत्वावर मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.

(5) अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीचा उपयोग. भारतमंत्री मोर्ले म्हणतात. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे.

पहिले महायुध्द -राष्ट्रीय चळवळ :-

 • 1914 -1918 या काळात पहिले महायुध्द झाले.
 • स्वातंत्र्य व लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि युध्द कायम नष्ट करणे या हेतूने आपण लढत आहोत असे मित्र राष्ट्रांनी जाहीर केले.
 • अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुदे जाहीर केले.
 • पारतंत्र देशाबाबतचे स्वयंनिर्णायाचे तत्व त्यामध्ये होते.
 • या दोस्त राष्ट्राच्या भूमिकेत भारतीय राष्ट्रवादी चळवळीला आशादायक प्रेरणा मिळाली याचा भारतीय राजकारणावर परिणाम दिसून आला.
 • इंग्रजांनी भारताची सहमती न घेता युध्दात खेचले 10 लाख भारतीय सैनिक युध्दात सहभागी करण्यात आले पैकी 1 लाख सैनिक युध्दात कामी आले 12.7 कोटी पौंड यूध्दखर्च भारतावर पडला 30 % कर्ज वाढले.
 • भारतीयांत नाराजी निर्माण झाली. याचवेळी इंग्रज अडचणीत असल्याने त्यांच्याकडून अनेक राजकीय मागण्या करण्यात आल्या त्याला चेंबरलेनने नकार दिला.
 • त्यामुळे लो.टिळक, डॉ बेझंट यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे कार्य :-

 • गोपाळ कृष्ण गोखले याचा जन्म रत्नागिरी जिल्हयातील कोतलुंक गावी 9 में 1866 रोजी झाला.
 • प्राथमिक शिक्षण कागल, माध्यमिक शिक्षण कोल्हापूर, उच्च शिक्षण पूणे व मुंबई,येथे झाले.
 • फ़र्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यपक, प्राचार्य म्हणून कार्य केले.
 • 1887 मध्ये न्या रानडे यांच्याशी संबंध येऊन देशसेवेच्या कार्याकडे वळले.
 • 1890 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. या सभेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या त्रैमासिकाचे संपादक झाले तसे सुधारक वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून काम केले.
 • भारतातील अर्थव्यवहाराच्या चौकशीसाठी 1896 मध्ये वेल्बी कमिशन नेमले होते.
 • त्यांच्या समोरील त्यांची साक्ष फार गाजली इंग्रज सरकार भारतीयांचे कसे व किती आर्थिक शोषण करते याची पुराव्यासह साक्ष दिली.
 • मुंबई प्रांताच्या कौन्सिलवर 1899 मध्ये निवडून आले.
 • 1902 मध्ये व्हाईसरॉय इंपिरियल कौन्सिलवर त्याची निवड झाली.
 • केंदि्रय अर्थसंकल्पावरील त्यांची 12 भाषणे गाजली त्यांनी भारताच्या राजकीय आर्थिक शैक्षणिक शेती, उद्योग, आयात-निर्यात, लष्करी, खर्च इत्यादींवर अभ्यासपूर्ण मते मांडली या संदर्भात सरकारकडे मागण्याही केल्या. र्लॉड कर्झनही गोखल्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते.
 • 1904 मध्ये भारत सेवक संघ नावाची संघटना स्थापन केली.
 • साम्राज्यांतर्गत स्वराज्य व देशबांधवांची उन्नती हे या संस्थेचे प्रमुख ध्येय होते. समाजसेवा सहकार, समाज शिक्षण, दु:ख निवारण, राजकीय जागृती, या साधनांमार्गे देशाची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला, 1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणांच्या स्वरूपात त्याचा मोठा सहभाग होता. इंग्लंडला जाऊन भारतमंत्र्याशी भारताच्या प्रश्नासंदर्भात सखोल चर्चा केली.
 • आफ़्रिकेत गोर्‍यांच्या विरुध्द आंदोलनात सहभाग घेतला. तेव्हाच गांधीजींनी त्यांना आपले राजकीय गुरु मानले.
 • 19 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांचे निधन झाले.

मवाळ राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे आणि कार्यपध्दती –

 • नागरी स्वातंत्र्य, स्वतंत्र वृत्तपत्रे, लोकशाहीनिष्ठ आणि वर्णभेद नसलेले प्रशासन हयांसाठी प्रारंभीच्या राष्ट्रवाद्यांनी सतत लढा दिला.
 • किंबहुना याच काळात राष्ट्रवाद्यांनी केलेल्या राजकीय प्रबोधनामुळे भारतीय जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांना लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.
 • आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञान जनतेत व विशेषत: बुध्दिमंतांत लोकशाहीची संकल्पना रुजू लागली.
 • आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रसार व्हा म्हणूनही मवाळ विचारांचे नेते झटले.
 • प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवाद्यांच्या चळवळीचा पाया अरुंद होता की एक उणीव होती. त्यावेळी या चळवळीला मोठया प्रमाणात प्रतिशाद नव्हते.
 • मवाळांचे राजकीय पबोधन कार्य शहरांती शिक्षित मध्यमवर्गीयांपुरते मर्यादित राहिले, मात्र त्याची धोरणे व कार्यक्रम मध्यवर्गीयापुरते मर्यादित नव्हते.
 • समाजाच्या सर्व वर्गातील लोकांच्या गर्‍हाण्यांची त्यांनी दखल घेतली व वसाहतवादाच्या वर्चस्वाविरुध्द उभरत्या भारतीय राष्ट्राच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व केले.
 • कोणतीही चळवळ घटनात्मक मार्गानी आणि कायद्यांच्या चौकटीत राहूनच करावयास हवी, असा मवाळांचा कटाक्ष होता म्हणूनच जाहीर सभा आणि वृत्तपत्रे यांवरच त्यांचा भर होता. अतिशय काळजीपूर्वक तयार केलेली अनेक निवेदने व अर्ज त्यांनी सरकारला पाठविले.
 • वरवर पाहता ही जरी सरकारला पाठविलेली निवेदने व अर्ज असले तरी त्याचे मूळ उद्दिष्ट जनतेला शिक्षित करणे व राजकीय प्रश्नांबाबत जागृत करणे हेच होते.
 • उदाहरणार्थ 1891 मध्ये न्या. मू. रानडयांनी गोपाळ कृष्ण गोखल्यांना सांगितले की, आपल्या देशाच्या इतिहासात आपले स्थान कोणते हयाची तुम्हाला कल्पना नाही, ही निवेदने सरकारला उद्देशून असली तरी ती नाममात्र आहेत.
 • वस्तुत ती जनतेला उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांच्याद्वारेच हया प्रश्नावर कसा विचार करावयाचा ते त्यांना कळून येईल. कारण हया प्रकारचे राजकारण हया देशाला सर्वस्वी नवे आहे.
 • हे राष्ट्रवादी राजकीयदृष्टया मवाळ असले तरी अधिकारी आणि ब्रिटिश राजकीय नेते त्यांना राजद्रोही आणि बंडखोर मानीत.
 • व्हाईसरॉय र्लॉड कर्झन तर इसवी सन 1900 मध्ये म्हणाला होता की, काँग्रेस नष्ट करण्यात माझा हातभार लागावा अशी माझी महत्वाकांक्षा आहे. कारण अगदी अल्प प्रमाणात का होईना पण मवाळांनीच देशात साम्राज्यविरोधी जागृती केली होती.
 • साम्राज्यवादाचे त्यांनी आर्थिकदृष्टया जे प्रभावी विश्लेषण केले त्यातूनच पुढे ब्रिटिश वसाहतवादाविरुध्द जनतेची क्रियाशील चळवळ सुरु झाली.
 • आपल्या आर्थिक लढयाद्वारा त्यांनी ब्रिटिश सत्तेचे जे क्रर व शोषक स्वरूप स्पष्ट केले त्यामुळे या सत्तेचा नैमिक पायाच ढासळला. शिवाय मवाळ पक्षियांचा भर धार्मिक किंवा भावनिक आवाहनापेक्षा प्रत्यक्ष अभ्यास आणि जनतेला दररोज ज्या दिव्यांतून जावे लागते त्याचे परखड विश्लेषण हयांवर होता.
 • राष्ट्रीय चळवळीसाठी असा भक्कम पाया तयार केल्यावरच राष्ट्रव्यापी आंदोलन करावे, असा त्यांचा मानस होता व पूढे अशी राष्ट्रव्यापी चळवळ झालीही.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World