महिलांसाठी काही महत्वाच्या योजना
महिलांसाठी काही महत्वाच्या योजना
जननी सुरक्षा योजना
- जननी सुरक्षा योजनेचा उद्देश अनुसूचित जाती/अनूसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांचे आरोग्य संस्थेत होणार्या प्रसूतीचे प्रमाण वाढवणे व मातामृत्यू आणि अर्भकमृत्युचे प्रमाण कमी करणे हे आहे.
- या योजनेनुसार अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांची शासकीय अथवा शासन मानांकित.
आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास ग्रामीण भागात 700 रुपये तर शहरी भागात 600 रुपये इतका लाभ धनादेशा व्दारे महिलेला देण्यात येतो.
तसेच फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलेची प्रसूती घरी झाली तर 500 रुपये इतका लाभ घनादेशव्दारे महिलेला देण्यात येतो.
गरोदर माता व स्तनदा मातांना मोफत सेवा
- गरोदरपणात, बाळंतपणात व बाळंतपणानंतर 42 दिवसापर्यंत मातांना शासकीय दवाखान्याव्दारे या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
- मोफत साधारण बाळंतपण व गरज पडल्यास मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया प्रसुती, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा चाचण्या व इतर तपासण्या (अर्थात आरोग्य संस्थेच्या दर्जानुसार जेथे या सुविधा उपलब्ध असतील तेथे.
मातृत्व अनुदान योजना
- नवसंजीवनी योजनेंतर्गत मातृत्व अनुदान योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे.
- गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना सुयोग्य आहार वेळेत उपलब्ध व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेमध्ये गरोदरपणामध्ये रुपये 400/- रोखीने व रुपये 400/- ची औषधे याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला एकूण रुपये 800/- चा लाभ दिला जातो.