फली नरिमन यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार प्रदान

फली नरिमन यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार प्रदान

  • सार्वजनिक व्यवहारातील उत्कृष्ट कार्याबद्दल कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांना 22 ऑक्टोबर 2018 रोजी राष्ट्रीय लालबहादूर शास्त्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लालबहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्था, दिल्ली यांच्याकडून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

fali nariman yanna laalbahadur shastri puraskar

फली नरिमन यांच्याविषयी माहिती –

जन्म: 10 जानेवारी 1929, रंगून.

शिक्षण
: मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून कला शाखेत पदवी. तसेच मुंबईतील सरकारी विधी महाविद्यालयातून विधी शाखेत पदवीधर.

कार्य:

  1. सन 1950 पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू.
  2. सन 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीतज्ज्ञ म्हणून कामाला सुरुवात.
  3. मे 1972 ते जून 1975 पर्यन्त केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी कार्य.
  4. भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार युनियं कार्बाइड कंपनीचे वकील म्हणून या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणून पीडितांना 47 कोटी डॉलर्सची भरपाई मिळवून देण्यात महातवाच भूमिका.
  5. गोलकनाथ टीएमए पै फाउंडेशन, एसपी गुप्ता असे अनेक खटले लढले.

मिळविलेले सन्मान –

  • पद्मभूषण (1991), पद्मविभूषण (2007).
  • 1999-2005: या कालावधीसाठी राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त.
  • Gruber Prize for Justices (2002).
पुरस्काराविषयी माहिती –
1. सुरुवात: 1999.
2. सार्वजनिक व्यवहारातील उत्कृष्ट कार्याबद्दल दरवर्षी.
3. स्वरूप: 5 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह.
4. सन 2007 चा पुरस्कार: बिंदेश्वर पाठक.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.