कार्य बद्दल संपूर्ण माहिती

कार्य बद्दल संपूर्ण माहिती

 • ‘कार्य’ म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.
 • w = f × s
 • कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही ‘आदिश राशी’ आहे.
 • SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन – मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे.
 • CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.
 • 1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
 • 1 अर्ग  = 1 डाईन  × 1 सें.मी.
 • 1 ज्यूल = 107 अर्ग  

 घन, ऋण व शून्य कार्य :

 • ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य घन असते.
 • बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते.
 • ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते.
 • उदाहरणे :-
 1. बंद बस ढकलणे – धन कार्य
 2. चेंडूचा झेल घेणे – ऋण कार्य
 3. दोरीला बांधलेला दगड फिरवणे – शून्य कार्य
 • पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.
 • यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे.
 • सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात.
 • त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.