जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळ
- युनोची संघटना यूनेस्को सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी तयार करते, सध्या जगत 1031 वारसा स्थळे यादीत आहेत, जगात इटली (51), चीन (48), स्पेन (48), फ्रांस (41), भारत (32), जर्मनी (40), मेक्सिको (33), जगात भारत सातव्या क्रमांकावर आहे. आशियात चीनमध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत.
- वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि पुढच्या पिढ्यापर्यंत हा अमुल्य वारसा सुपूर्द करणे ही उद्दिष्टे आहे.
- भारतात सर्वप्रथम 1983 मध्ये आगर्याचा किल्ला व अजंठा लेणी या दोन स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला, सध्या भारतात 32 स्थळे यादीत आहेत. त्यापैकी 25 सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, तर 7 निसर्गस्थळे आहेत.
- महाराष्ट्रात सर्वाधिक चार स्थळे आहेत. (अजंठा व वेरूळ लेणी (1983), घारापुर लेणी (1987), छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशन (मुंबई) 2004)
- दिल्ली – कुतुबमिनार, हुमायुचा मकबरा, लाल किल्ला
- मध्य प्रदेश – भीम बेरकांच्या अश्मकालीन गुफा, सांचीचा स्तूप खजुराहोची मंदिरे
- राजस्थान – केवलदआ राष्ट्रीय उद्यान, जंतरमंतर खगोल प्रयोगशाळा चित्तोड, ‘गाग्रोन, जैसलमेर कुंभलगड, अंबर, रणथंबोर हे किल्ले.
- उत्तर प्रदेश – आगर्याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, ताजमहल.
- आसाम – काझीरंगा, मानसा अभयारण्य
- गुजरात – रानी की वाव, चंपानेर-पावागड पुरातत्व परिसर.
- कर्नाटक – विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे.
- तामीळनाडू – तंजावर गंगाईकोंड चोल पूरम व दोरयसम येथील मंदिर, महाबलीपूरम.